जनरिसच्या खरेदीनंतर अरबिंदो फार्माचा शेअर तेजीत

वृत्तसंस्था
सोमवार, 9 जानेवारी 2017

मुंबई: अरबिंदो फार्माने पोर्तुगीजमधील फार्मा कंपनीच्या खरेदीची घोषणा केल्यानंतर आज(सोमवार) इंट्राडे व्यवहारात कंपनीच्या शेअरमध्ये तेजी निर्माण झाली आहे. मुंबई शेअर बाजारात कंपनीच्या शेअरने 725 रुपयांवर दिवसभराची उच्चांकी पातळी गाठली आहे.

अरबिंदो फार्माने पोर्तुगालच्या जनरिस फार्मास्युटिकाची 135 दशलक्ष युरो अर्थात 969 कोटी रुपयांना खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. उपकंपनी एजाइल फार्मा बीव्ही नेदरलँड्समार्फत मॅग्मम कॅपिटल पार्टनर्सकडून ही खरेदी केली जाणार आहे.

जनरिसकडून पोर्तुगालमध्ये औषधांचे उत्पादन व विक्री केली जाते. कंपनीच्या पोर्तुगाल प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता 1.2 अब्ज टॅब्लेट्स/कॅप्सुल्स/सॅशेच्या निर्मितीची आहे. या अधिग्रहणामुळे अरबिंदो फार्माचा पोर्तुगीज बाजारापेठेतील स्थान मजबूत होण्यास मदत होईल, असे कंपनीने म्हटले आहे.

मुंबई शेअर बाजारात कंपनीचा शेअर सध्या(सोमवार, 11 वाजून 45 मिनिटे) 703.70 रुपयांवर व्यवहार करत असून 1.58 टक्क्याने वधारला आहे.

Web Title: Aurobindo Pharma Shares Jump After Acquisition Of Portugal-Based Generis