
गुंतवणूक संधी : थिमॅटिक ॲडव्हांटेज फंड
- अविनाश माने
थिमॅटिक गुंतवणूक म्हणजे तुमचे पैसे अशा ठिकाणी गुंतवणे जिथे तुमचा सर्वाधिक भरवसा आहे. जर तुम्हाला विश्वास वाटतो, की टेक्नॉलॉजी क्षेत्र हे पुढील काही वर्षांत प्रचंड यशस्वी होईल, तर थिमॅटिक गुंतवणूक रणनिती तुमचा पैसा टेक्नॉलॉजी कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवेल. यामुळे तुमची संपत्ती वाढेल आणि तुमचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकेल. असे समजा, की वर्ष २०१० सुरु आहे आणि भारतावर ‘फेसबुक’चे गारुड आहे. तुम्हीही त्या साईटवर सक्रिय आहात आणि तुम्हाला असे वाटते, की या कंपनीत प्रचंड क्षमता आहे. या ठाम विश्वासानंतर तुम्ही काय कराल?
तुम्ही तुमच्याकडील पैसे अशा तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये गुंतवाल की ज्यांनी ‘फेसबुक’मध्ये गुंतवणूक केली आहे, जेव्हा कंपनीने २०१२ मध्ये सार्वजनिक समभागविक्री केली होती. आजच्या घडीला तुमची गुंतवणूक आठ पटीने वाढलेली असेल.
थिमॅटिक गुंतवणुकीत वृद्धीची ही उपजत क्षमता असते. त्याशिवाय तुम्हाला खुल्या बाजारातील जोखीम घेण्याची आवश्यकता देखील नसते. तुम्ही तुमच्याकडील पैसे थिमॅटिक ॲडव्हांटेज म्युच्युअल फंडात गुंतवू शकता, जे त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून हाताळले जातात आणि तुमचा पैसा बाजाराच्या वृद्धीनुसार कसा वाढेल, याची काळजी घेतात.
कोणती थिम आणि दृष्टीकोन हवा?
एखादी संकल्पना (थीम) ही संबंधित क्षेत्र, शेअर यांचे मिश्रण असून, सामान्य कल्पना आणि संधी यांच्यात परस्पर गुंतलेले आहेत. यात कोणत्याही क्षेत्राचा समावेश होऊ शकतो, जसे की औषधनिर्माण, ऊर्जा, दूरसंचार आदी. अशाच पद्धतीने संबंधित कंपन्यांचे शेअर. सर्वसाधारणपणे ‘थीम’ची निवड करणे अनेकांसाठी कठीण आणि आव्हानात्मक असते. क्षेत्रीय कामगिरी आणि सूक्ष्म घटकांना समजून घेण्यास अडचणी येणे, अपुरा वेळ आणि सखोल अभ्यासाची कमतरता, भावनांना आवर घालणे, पक्षपातीपणा टाळणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे करबचतीच्या दृष्टीने योग्य वेळी गुंतवणूक काढण्याचा निर्णय घेणे अवघड असते. या सर्व आव्हानांसाठी एक सोपा मार्ग म्हणजे तुमचा निर्णय तज्ज्ञांवर सोपवा आणि चांगल्या परताव्याचा आनंद घ्या.
जर तुम्हाला नव्या वर्षाची चांगली सुरवात करायची असेल आणि भविष्याचा वेध घ्यायला असेल तर बाजारात दाखल झालेल्या आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल थिमॅटिक ॲडव्हान्टेज फंडचा विचार करता येऊ शकेल, ज्याचा उद्देश हा वेगवेगळ्या संकल्पना आणि क्षेत्रातील संधी हेरून तुमच्यासमोर आदर्श गुंतवणूकपर्याय समोर ठेवणे हा आहे.
(लेखक म्युच्युअल फंड वितरक आहेत.)
Web Title: Avinash Mane Writes Investment Opportunity Thematic Advantage Fund
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..