अॅक्सिस बँकेच्या हिस्साखरेदीस अनेक बँका उत्सुक

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

मुंबई: कोटक महिंद्रा बॅंकेमध्ये अॅक्सिस बँकेच्या विलीनीकरणाच्या बातमीमुळे कालच्या सत्रात अॅक्सिस बँकेचा शेअर 5 टक्क्यांनी वधारला होता. मात्र अॅक्सिस बँकेचे कोटक महिंद्रा बॅंकेत विलीनीकरणाचे वृत्त खोटे असल्याचे कोटक महिंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्र सरकार यूटीआयच्या माध्यमातून अॅक्सिस बँकेतील हिस्सेदारी विकणार आहे. त्यासाठी मात्र कोटक महिंद्रा बॅंक, आयसीआयसीआय बँक तसेच खाजगी क्षेत्रातील इतर बँकांनी खरेदी करण्याची इच्छा दर्शविली आहे. तसेच एचडीएफसी, इंडसइंड बॅंक, एचडीएफसी बँक हे देखील खरेदीसाठी उत्सुक आहेत.

मुंबई: कोटक महिंद्रा बॅंकेमध्ये अॅक्सिस बँकेच्या विलीनीकरणाच्या बातमीमुळे कालच्या सत्रात अॅक्सिस बँकेचा शेअर 5 टक्क्यांनी वधारला होता. मात्र अॅक्सिस बँकेचे कोटक महिंद्रा बॅंकेत विलीनीकरणाचे वृत्त खोटे असल्याचे कोटक महिंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्र सरकार यूटीआयच्या माध्यमातून अॅक्सिस बँकेतील हिस्सेदारी विकणार आहे. त्यासाठी मात्र कोटक महिंद्रा बॅंक, आयसीआयसीआय बँक तसेच खाजगी क्षेत्रातील इतर बँकांनी खरेदी करण्याची इच्छा दर्शविली आहे. तसेच एचडीएफसी, इंडसइंड बॅंक, एचडीएफसी बँक हे देखील खरेदीसाठी उत्सुक आहेत. मात्र त्यामुळे सरकारला आता बोली पद्धतीने अॅक्सिस बँकेतील हिस्सेदारीची विक्री करावी लागण्याची शक्यता आहे.

अॅक्सिस बँकेमध्ये एलआयसीची 14.5 टक्के, एसयूयूटीआयची 12 टाके, जीआयसीची 1.74 टक्के, न्यू इंडिया इन्शुरन्सची 1.14 टक्के हिस्सेदारी आहे.

सध्या मुंबई शेअर बाजारात अॅक्सिस बँकेचा शेअर 518.45 रुपयांवर व्यवहार करत असून तो 13.85 रुपयांनी म्हणजेच 2.74 टक्क्यांनी वधारला आहे. दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरने वर्षभरात 366.65 रुपयांची नीचांकी तर 638 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.123,654.79 कोटींचे बाजारभांडवल आहे.

Web Title: Axis Bank: Talk of suitors lining up lifts Axis Bank shares