'हा' भारतीय उद्योगपती कोरोनासाठीच्या मदतनिधीत जगात ३ ऱ्या क्रमांकावर

यूएनआय
Tuesday, 12 May 2020

कोविड-१९ महामारीमुळे जग प्रचंड मोठ्या संकटाचा सामना करत आहे. लाखो लोकांना कोविड-१९ची लागण झाली आहे. मृत्यू झालेल्यांची संख्या लक्षणीय आहे. विविध देशांची सरकार या संकटाला तोंड देण्यासाठी उपाययोजना करत आहेत. त्याचवेळेस जगातील अनेक श्रीमंत, उद्योगपतीसुद्धा पुढे सरसावले आहेत आणि त्यांनी मोठ्या रकमांची देणगी दिली आहे.

कोरोना-मदतनिधीत दानशूर अझिम प्रेमजी आघाडीवर, जगातील कोणकोणत्या श्रीमंतांनी केली मदत

* कोरोनासाठीच्या मदतनिधीला विप्रोचे संस्थापक अझिम प्रेमजी यांनी केली १३.२ कोटी डॉलरची (१,००० कोटी रुपये) मदत
* मदत करणाऱ्या श्रीमंतांच्या जागतिक यादीत प्रेमजी तिसऱ्या क्रमांकावर
* टविटरचे सीईओ जॅक डोर्से यांची १ अब्ज डॉलरची मदत
* बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी २५.५ कोटी डॉलरची मदत 
* अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझॉसची १० कोटी डॉलरची मदत

कोविड-१९ महामारीमुळे जग प्रचंड मोठ्या संकटाचा सामना करत आहे. लाखो लोकांना कोविड-१९ची लागण झाली आहे. मृत्यू झालेल्यांची संख्या लक्षणीय आहे. विविध देशांची सरकार या संकटाला तोंड देण्यासाठी उपाययोजना करत आहेत. त्याचवेळेस जगातील अनेक श्रीमंत, उद्योगपतीसुद्धा पुढे सरसावले आहेत आणि त्यांनी मोठ्या रकमांची देणगी दिली आहे. फोर्बसने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिलअखेर ७७ अब्जाधीशांनी कोरोना मदतनिधीसाठी मदत केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाविरुद्धच्या संघर्षात मदत करणाऱ्या श्रीमंतांमध्ये टविटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्से यांनी सर्वाधिक रक्कमेची मदत केली आहे. डोर्से यांनी १ अब्ज डॉलरची मदत केली आहे.

'मी इक्विटी हिश्यातील १ अब्ज डॉलरची संपत्ती (संपत्तीच्या २८ टक्के) #startsmall LLC ते जगभरातील कोविड-१९ मदतनिधीला दिली आहे', असे टविट डोर्से यांनी केले आहे. तर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी २५.५ कोटी डॉलरची मदत कोरोना मदतनिधीला केली आहे.

रिअल इस्टेटची "रिअॅलिटी' आणि भविष्यातील आव्हाने

कोरोना-मदतनिधीला मदत करणाऱ्या टॉप १० लोकांमध्ये अझिम प्रेमजी हे एकमेव भारतीय आहेत. टॉप १० दानशूरांमध्ये अमेरिकन नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे.

विप्रोचे चेअरमन अझिम प्रेमजी यांनी १३.२ कोटी डॉलरची (जवळपास १,००० कोटी रुपये) मदत केली आहे. जगभरातील कोरोना रिलिफ फंडासाठी मदत करणाऱ्या श्रीमंतांच्या यादीत अझिम प्रेमजी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 

अझिम प्रेमजी फाऊंडेशन, विप्रो आणि विप्रो एंटरप्राईझेस यांनी एकत्रितरित्या १,१२५ कोटी रुपयांची मदत या अभूतपूर्व संकटाचा सामना करण्यासाठी दिली आहे. या १,१२५ कोटी रुपयांच्या मदतीपैकी १०० कोटी रुपयांची मदत विप्रोने केली आहे. तर विप्रो एंटरप्राईझेसने २५ कोटी रुपयांची मदत केली आहे. अझिम प्रेमजी फाऊंडेशनने १,००० कोटी रुपयांची मदत केली आहे.

बँक अधिकाऱ्यांसोबतची बैठक पुढे ढकलली

मदत करणाऱ्या श्रीमंतांच्या जागतिक यादीत चौथ्या क्रमांकावर जॉर्ज सोरोस हे आहेत. त्यांनी १३ कोटी डॉलरची मदत केली आहे. अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस १० कोटी डॉलरच्या मदतीसह पाचव्या क्रमांकावर आहेत. पार्टिसिपेंट मिडिया ऑफ स्कोल फाऊंडेशनचे संस्थापक आणि चेअरमन जेफ्री स्कोल यांनी १० कोटी डॉलरची मदत केली आहे. ऑस्ट्रेलियन उद्योगपती अॅंड्रयू फॉरेस्ट १० कोटी डॉलरच्या मदतीसह सातव्या क्रमांकावर आहेत. 

अमेरिकन अब्जाधीश मायकेल डेल यांनी १० कोटी डॉलरची मदत केली आहे. ब्लूमबर्गचे संस्थापक आणि चेअरमन मायकल ब्लूमबर्ग यांनी ७.४५ कोटी डॉलरची मदत जाहीर केली आहे. दहाव्या क्रमांकावर लिन अॅंड स्टॅसी स्कस्टरमन हे आहेत. त्यांनी ७ कोटी डॉलरची मदत केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Azim Premji third among global list for corona relief fund