बजाज ऑटोच्या विक्रीचा आलेख घसरताच

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 जून 2017

नवी दिल्ली: दुचाकी उद्योगातील प्रमुख कंपनी बजाज ऑटोच्या मासिक विक्रीचा आलेख पुन्हा एकदा घसरला आहे. बजाज ऑटोने मे महिन्यात 3,13,756 वाहनांची विक्री केली असून त्यात 10 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्यावर्षी याच काळात कंपनीच्या 3 लाख 47 हजार 655 वाहनांची विक्री झाली होती.

देशांतर्गत विक्रीप्रमाणेच कंपनीची निर्यातदेखील 3 टक्क्यांनी घसरली आहे. कंपनीने मे महिन्यात 1 लाख 39 हजार 709 वाहनांची निर्यात केली. गेल्यावर्षी मे महिन्यात हे प्रमाण 1 लाख 43 हजार 421 एवढे होते. कंपनीच्या मोटरसायकल विक्रीत सुमारे 10 टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली आहे. सरलेल्या मे महिन्यात कंपनीच्या 2 लाख 77 हजार 115 मोटरसायकलींची विक्री झाली असून, गेल्यावर्षी याच काळात कंपनीने 3 लाख 07 हजार 344 मोटारींची विक्री केली होती. दरम्यान, कंपनीच्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीचे प्रमाण 9 टक्क्यांनी घसरुन 36 हजार 641 युनिट्सवर पोचले आहे.

मुंबई शेअर बाजारात सध्या(12 वाजून 35 मिनिटे) कंपनीचा शेअर 2819.90 रुपयांवर व्यवहार करत असून 20.85 रुपये अर्थात 0.73 टक्क्याने घसरला आहे. दहा रुपये दर्शनी मूल्य असणाऱ्या शेअरने वर्षभरात 2510 रुपयांची नीचांकी तर 3122 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या भावानुसार कंपनीचे 81,598.61 कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.

Web Title: Bajaj Auto sales fall graph