bajaj finance : बजाज फिनसर्व वेडिंग लोनसह लग्नखर्चाला हातभार लावण्याचे सर्वोत्तम मार्ग

लग्न खर्चामुळे एखाद्याने आयुष्यभर कमावलेल्या बचतीला भगदाड पडू शकते
bajaj finance
bajaj finance

बजाज फिनसर्व वेडिंग लोनसह लग्नखर्चाला हातभार लावण्याचे सर्वोत्तम मार्ग

वेडिंग लोन किंवा वैयक्तिक कर्ज हा व्यक्तिनुरूप कर्ज पर्याय असून त्याद्वारे कर्जाऊ रक्कम घेणाऱ्याच्या अनेक विवाह-विषयक खर्चांकरिता हातभार लागतो. लग्न खर्चामुळे एखाद्याने आयुष्यभर कमावलेल्या बचतीला भगदाड पडू शकते. तसेच समारंभात यशस्वी करण्यात मिठाचा खडा पडू शकतो. विवाह स्थान निवडणे, पेहराव पसंती आणि दागिने खरेदीपासून ते पाहुण्यांच्या निवासाची सोय करणे अशास्वरूपाची सतराशे साठ कामे आणि त्यामुळे होणारा भरमसाठ खर्च एखादे लग्न ठरल्यावर समोर उभे राहतात.

तरीही स्वप्नवत विवाहाचे नियोजन दिवा स्वप्न न राहता, वेडिंग लोन (wedding loan) उपलब्धतेमुळे सहज पूर्ण करता येते. त्यासाठी कर्ज इच्छुक व्यक्तिला एखाद्या बजाज फिनसर्वसारख्या नामांकित वित्तसाह्य संस्थेतून बक्कळ रकमेचे कर्ज मिळू शकते. या निधीतून विवाह खर्च सहज भागवता येईल. जरी सुरुवातीला बांधलेल्या आराखड्यापेक्षा खर्चाचा आकडा वाढल्यास पर्सनल लोनचा पर्याय मोकळा आहे.

बजाज फिनसर्व वेडिंग लोनची वैशिष्ट्ये

वेडिंग लोन किंवा पर्सनल लोन ही व्यक्तिगत आर्थिक ऑफर असून त्यात पुढील वैशिष्ट्ये आहेत-

विनाकटकटीचा अर्ज : कर्जदार वेडिंग लोनसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करून सहजपणे ऑनलाईन अर्ज करू करून त्वरित त्यांचे लोन मंजूर करून घेऊ शकतात.

जलद वितरण : कर्जदारांनी संपूर्ण लग्न खर्चाचा हिशोब दिला असला, तरीही त्यांना कोणत्याही वेळी जास्त पैशांची गरज भासू शकते. म्हणून, अशा आर्थिक निकडीच्या वेळी पर्सनल लोन हा एक दिलासा ठरतो. याखेरीज, क्रेडीट पर्यायासाठी कमीत कमी कागदपत्रांची गरज असल्याने कर्जदाराला कर्जाचे त्वरित कर्ज वितरण मिळते.

बचत सुरक्षित रहाते : व्यक्तींना बजाज फिनसर्वसारख्या नामांकित वित्त संस्थेकडून 25 लाख रुपयांपर्यंतची मोठी रक्कम कर्ज म्हणून मिळत असल्याने त्यांना लग्नाचा अफाट खर्च भागवण्यासाठी स्वत:ची गुंतवणूक मोडावी लागत नाही किंवा बचतही संपवावी लागत नाही.

निधीतून विविध खर्च : लग्नासाठी होणारा ठिकाणाचा खर्च, पाहुण्यांच्या रहाण्याचा खर्च, सजावट इ. वेगवेगळ्या खर्चासाठी ही रक्कम वापरता येत असल्याने लग्नाचा मोठा सोहळा करण्यासाठी, पर्सनल लोनवर अवलंबून रहाणे फायद्याचे असल्याचे सिद्ध झाले आहे. शिवाय, लग्नातील सजावट आपल्या आर्थिक आवाक्यात ठेवण्याचे नियोजन केल्याने लग्नाचा खर्च कमी करता येऊ शकतो. तरीही, क्रेडीट पर्याय हा केवळ लग्नाशी संबंधित खर्चाशी मर्यादित नसल्याने, या पैशांचा वापर आपल्या स्वप्नातील हनिमून प्रत्यक्षात आणण्यासाठी करता येऊ शकतो.

आकर्षक व्याज दर : कर्जदारांना परवडणार्‍या व्याज दरावर त्यांना वेडिंग लोन सुविधा मिळत असल्याने, त्यांच्या डोक्यावरील ईएमआयचे ओझे कमी होते आणि कर्ज घेणे किफायतशीर ठरते. अधिक स्पष्टता यावी यासाठी व्यक्ती पर्सनल लोन कॅल्क्युलेटरचा उपयोग करून ईएमआयची रक्कम बघू शकतात आणि त्यानुसार कर्ज फेडण्याच्या वेळापत्रकाचे नियोजन करू शकतात.

फ्लेक्सी लोन सुविधा : कर्जदारांना फ्लेक्सी पर्सनल लोनचा लाभ मिळू शकतो. फ्लेक्सी लोन सुविधेमुळे एखाद्या व्यक्तीला मंजूर रकमेतील कर्जाची रक्कम काढता येते आणि केवळ काढलेल्या कर्ज मुद्दलावरच व्याज भरावे लागते. यामुळे लग्नाचा खर्च आटोक्यात ठेवता येतो.

वेडिंग लोन घेण्यापूर्वी लक्षात घेण्याजोग्या बाबी:

वेगवेळ्या कर्जदात्यांची तुलना करा : लग्नासाठी सर्वोत्कृष्ट पर्सनल लोन सुविधेचा लाभ घेण्यापूर्वी, कर्जदाराने वेगवेळ्या कर्जदात्यांची तुलना केली पाहिजे आणि सर्वात कमी व्याज दर आणि उत्कृष्ट कर्ज अटी असलेल्या कर्जदात्यांकडून त्याने कर्ज घेतले पाहिजे.

सिबिल (सीआयबीआयएल) स्कोअर राखणे : वेडिंग लोन हा एक अनसेक्‍योर्ड आर्थिक पर्याय असल्याने, कर्ज मंजूरी ही कर्जदाराच्या सिबिल स्कोअरवर अवलंबून असते. कमी व्याज दारावर कर्ज त्वरित मंजूर होण्यासाठी कर्जदाराचा सिबिल स्कोअर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे असते. कमी दर्जाचा सिबिल स्कोअर असलेल्या व्यक्तीला आपला वैयक्तिक क्रेडीट स्कोअर सुधारण्याचे मार्ग माहीत असलेच पाहिजेत.

रोजगार स्थिती : कर्ज अर्ज मंजूर करण्यापूर्वी, कर्जदाराच्या रोजगाराची स्थिती, नोकरीची सुरक्षितता, मासिक उत्पन्न स्थिती इ. बाबी कर्जदात्याकडून तपासल्या जातील. कर्जदाराची कर्ज परतफेड करण्याच्या क्षमतेची खातरजमा करून घेण्यासाठी या सर्व बाबी तपासल्या जातात. म्हणून, लग्नासाठी बजाज फिनसर्व पर्सनल लोनची सुविधा मिळवण्यासाठी, कर्जदाराने स्थिर उत्पन्न स्रोत दाखवणे गरजेचे आहे.

याखेरीज, कर्जदाराला पर्सनल लोनवरील लागू शुल्क आणि आकार माहीत असणे गरजेचे आहे. कर्जदाराचे चालू असणारे कर्ज आणि इतर जबाबदार्‍यांची माहिती जाणून घेतल्यावर त्यानुसार कर्जदाता कर्जाची रक्कम वितरीत करेल.

वर नमूद करण्यात आलेल्या बाबींव्यतिरिक्त, बजाज फिनसर्वसारख्या अनेक वित्त संस्थांतर्फे पर्सनल लोन्स, बिझनेस लोन्स, क्रेडीट कार्ड्स इ. आर्थिक उत्पादनांवर वैयक्तिक गरजांनुसार देण्यात येणार्‍या आधीच मंजूर करण्यात आलेल्या (प्री अपृव्ह्ड) ऑफर्स कर्जदारांनी तपासून बघणे आवश्यक आहे. या ऑफर्समध्ये त्वरित कर्ज देण्याच्या प्रक्रियेची हमी असल्याने कर्जदारांसाठी त्या मान्यता देणार्‍या आणि विनाकटकटीच्या असतात. इच्छुक व्यक्तींनी स्वत:चे नाव आणि संपर्क विवरण सदर करून त्यांच्या आधीच मान्य झालेल्या (प्री अपृव्ह्ड) ऑफर्स (pre approved offers) तपासून बघाव्यात.

थोडक्यात म्हणजे, कर्जदाराला संपूर्ण लग्नाच्या खर्चाचा भार उचलण्यासाठी मदत करणारा वेडिंग लोन हा पर्सनल लोनचा एक व्यावहारिक प्रकार आहे. एखाद्या व्यक्तीकडे कमी निधी असेल किंवा लग्नाचा खर्च भागवण्यासाठी तिला आपली बचत वापारावी लागणार असेल, तर लग्नासाठी पर्सनल लोन घेणे हा एक हुशारीचा मार्ग आहे. तरीही, अशाप्रकारचे कर्ज घेण्यापूर्वी कर्जदारांनी वेडिंग लोन संदर्भातील इत्यंभूत माहिती समजून घेणे महत्त्वाचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com