Balaji Wafers Success : थिएटरमध्ये वेफर्स विकणाऱ्यानं तयार केलाय कोट्यवधींचा ब्रँड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balaji Wafers

Balaji Wafers Success : थिएटरमध्ये वेफर्स विकणाऱ्यानं तयार केलाय कोट्यवधींचा ब्रँड

छोट्या छोट्या व्यवसायापासून सुरुवात करून अनेक व्यावसायिक मोठे झाले आहेत. असाच एक ब्रँड म्हणजे बालाजी नमकीन, जो गुजरातच्या रस्त्यावरून प्रसिद्ध नमकीन ब्रँड बनला आहे. चंदूभाई विराणी हे गुजरातचे एक यशस्वी उद्योगपती आहेत, ज्यांनी अनेक अपयशानंतरही हार मानली नाही आणि आज ते 3 हजार कोटींच्या कंपनीचे मालक आहेत.

चंदूभाई, भिखुभाई आणि मेघजीभाई विराणी या तीन भावांचा जन्म गुजरातमधील जामनगर या छोट्याशा गावात झाला, त्यांनी त्यांच्या वडिलांकडून व्यवसाय करण्यासाठी 20 हजार रुपये घेतले. या तिन्ही भावांचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. 1972 मध्ये तिन्ही भावांनी गावातून शहरात जाण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा: आज रिक्षा बंद आंदोलन गाजणाऱ्या पुण्यातच एकेकाळी झालाय रिक्षाचा जन्म

या तिन्ही भावांनी शहरात व्यवसाय सुरू केला. पण व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नव्हते. या कारणावरून भावांनी वडिलांना जमीन विकण्यास भाग पाडले. वडिलांनी जमीन विकून व्यवसाय करण्यासाठी तिन्ही भावांना 20 हजार रुपये दिले. चंदूभाईंनी आपल्या भावांसोबत शेतीच्या उपकरणांचा व्यवसाय सुरू केला, परंतु व्यवसाय चालला नाही आणि नंतर पैसे कमवण्यासाठी त्यांनी सिनेमागृहाच्या आवारात एक छोटेसे कॅन्टीन उघडले आणि पत्नीने बनवलेले वेफर्स आणि सँडविच प्रामुख्याने तिथे विकले जात होते.

हे सर्व 15 वर्षे चालले आणि याच दरम्यान त्यांना कळले की, घरी बनवलेले वेफर्स ग्राहकांना खूप आवडतात. या क्षेत्रात मोठा उद्योग सुरू करण्याचा त्यांनी विचार केला. त्यासाठी त्यांनी 1989 मध्ये वेफर्स तळण्यासाठी सेमी-ऑटोमॅटिक प्लांटची स्थापना केली. बालाजी वेफर्सच्या बॅनरखाली त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. चांगल्या दर्जाचे वेफर्स परवडणाऱ्या किमतीत विकायचे. पण सुरुवातीला त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. पण त्यांनी हार मानली नाही आणि आज ते बालाजी वेफर्स ही कंपनी बाजारपेठेवर राज्य करत आहेत.

हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

हा व्यवसाय वार्षिक 3 हजार कोटी रुपयांचा आहे. उल्लेखनीय म्हणजे देशातील खाद्य पदार्थांची बाजारपेठ 50 हजार कोटी रुपयांची आहे. या मार्केटमध्ये सॉल्टेड स्नॅक्सचा वाटा 60 टक्के आहे, तर बटाटा चिप्सचा वाटा 40 टक्के आहे. Lay's, Crispy, Parle आणि Bingo सारखे जागतिक ब्रँडच्या तुलनेत बालाजी वेफर्सची चव आणि परवडणाऱ्या किमतींमुळे याला जास्त मागणी आहे.

आज राजकोट येथील बालाजी वेफर्स आणि नमकीन ग्रुपचा उत्पादन कारखाना 38 टन उत्पादन करत आहे आणि वलसाड येथील बालाजी वेफर्स आणि नमकीन ग्रुपचा उत्पादन कारखाना दररोज 24 टन वेफर्सचे उत्पादन करत आहे. मध्य प्रदेश हे विराणी बंधूंचे मूळ राज्य आहे. तिथे त्यांनी 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करून तिसरा उत्पादन प्रकल्प उभारला आहे. हा प्लांट पिथमपूर (इंदूर) येथे स्थापन झाला आहे. 2020 मध्ये बालाजी वेफर्सचा व्यवसाय वार्षिक सुमारे 3 हजार कोटींचा आहे.