नोव्हेंबरमध्ये बँकांना आठ दिवस सुट्या; शेवटच्या आठवड्यात तीन दिवस बँका बंद

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 October 2020

दिवाळी आणि शनिवार रविवारच्या सुट्या मिळून आठ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळं हे सुट्ट्यांचे दिवस पाहून बँकांच्या कामाचं नियोजन करावं लागणार आहे.

मुंबई : सणासुदीच्या काळात बँकांना असलेल्या सुट्या लक्षात घेऊन कामाचं नियोजन करावं लागतंय. हल्ली ऑनलाईन बँकिंग मोठ्याप्रमाणात सुरू झालं असलं तरी, बँकेला सुटी हा नेहमीच गैरसोयीचा विषय असतो. आता नोव्हेंबर महिन्यात ही गैरसोय जास्ती होणार आहे. दिवाळी आणि शनिवार रविवारच्या सुट्या मिळून आठ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळं हे सुट्ट्यांचे दिवस पाहून बँकांच्या कामाचं नियोजन करावं लागणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आणि गुरुनानक जयंती हे सण आहेत. त्यातील 14 नोव्हेंबरच्या दिवाळीच्या दिवशी बँकांना सुटी आहे. तर, शेवटच्या आठवड्यात तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यात शनिवार ,रविवार आणि गुरुनानक जयंतीच्या सुटीचा समावेश आहे. म्हणजेच सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे व्यापारी, ज्येष्ठ नागरिक यांनी या सुट्या पाहून बँकांच्या कामांचे नियोजन करण्याची गरज आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्या बँकांना सक्तीच्या असतात. काही राज्यांमध्ये स्थानिक सणांनुसार अतिरिक्त सुट्याही देण्यात येतात. 

हेही वाचा- टेरर फंडिंगः काश्मीरमध्ये वृत्तपत्र, NGO च्या कार्यालयांवर एनआयएचे छापे

नोव्हेंबरमधील सुट्या अशा
1 नोव्हेंबर - रविवार
8 नोव्हेंबर - रविवार 
14 नोव्हेंबर - दुसरा शनिवार आणि दिवाळी 
15 नोव्हेंबर - रविवार 
22 नोव्हेंबर - रविवार 
28 नोव्हेंबर - चौथा शनिवार 
29 नोव्हेंबर - रविवार
30 नोव्हेंबर - गुरुनानक जयंती

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank holiday Check out the full list of banks will be closed on these days in November

Tags
टॉपिकस
Topic Tags: