esakal | बँकेतील कामे उरकून घ्या; डिसेंबरमध्ये अर्धा महिना बँकेला सुट्टी
sakal

बोलून बातमी शोधा

bank

ख्रिसमसशिवाय इतर सुट्ट्या लागून असल्यानं अर्धा महिना बँका बंद असतील. त्यामुळे तुमची कामे अडून राहू नयेत यासाठी बँका कधी बंद आणि कधी सुरू असणार आहेत याची माहिती असायला हवी.

बँकेतील कामे उरकून घ्या; डिसेंबरमध्ये अर्धा महिना बँकेला सुट्टी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - डिसेंबर महिन्यात तुमची बँकेतील काही कामे असतील तर लवकर करून घ्या. पुढच्या महिन्यात जवळपास 14 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. ख्रिसमसशिवाय इतर सुट्ट्या लागून असल्यानं अर्धा महिना बँका बंद असतील. त्यामुळे तुमची कामे अडून राहू नयेत यासाठी बँका कधी बंद आणि कधी सुरू असणार आहेत याची माहिती असायला हवी.

पुढच्या महिन्यात 6 डिसेंबर, 13 डिसेंबर, 20 डिसेंबर, 27 डिसेंबर असे 4 रविवार असणार आहेत. त्यादिवशी बँकांना सुट्टी असते. तर 5 डिसेंबरला आणि 7 डिसेंबरला अनुक्रमे दुसरा आणि चौथा शनिवार असल्यानं बँका बंद असतील. 

हे वाचा - RBI गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणतात, भारतीय अर्थव्यवस्था येतेय रुळावर

शनिवार, रविवार वगळता ख्रिसमस आणि डिसेंबर महिन्याच्या शेवटीसुद्धा बँकांना सुट्टी असेल. वेगवेगळ्या सुट्ट्या मिळून एका महिन्यात 14 सुट्ट्या आहेत. बँका कधी बंद आहेत हे माहिती असल्याच कामे वेळेत करणं सोपं जाईल. 

   बँकेच्या सुट्ट्यांची यादी

    3 डिसेंबर 2020: गुरुवार (Kanakadasa Jayanthi/Feast of St. Francis Xavier)
    6 डिसेंबर 2020: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
    12 डिसेंबर 2020: शनिवार (Pa-Togan Nengminza Sangma-दूसरा शनिवार)
    13 डिसेंबर 2020: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
    17 डिसेंबर 2020: गुरुवार (Losoong/Namsoong)
    18 डिसेंबर 2020: शुक्रवार (Death Anniversary of U SoSo Tham/Losoong/Namsoong)
    19 डिसेंबर 2020: शनिवार (Goa Liberation Day)
    20 डिसेंबर 2020: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
    24 डिसेंबर 2020: गुरुवार (Christmas Festival)
    25 डिसेंबर 2020: शुक्रवार (Christmas)
    26 डिसेंबर 2020: शनिवार (Christmas Festival-चौथा शनिवार)
    27 डिसेंबर 2020: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
    30 डिसेंबर 2020: बुधवार (U Kiang Nangbah)
    31 डिसेंबर 2020: गुरुवार (Year's Eve)

हे वाचा - अमेरिकेची अर्थव्यवस्था येतेय रुळावर; जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत

रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर सुद्धा डिसेंबर महिन्यात किती दिवस बँका बंद असतील याची माहिती देण्यात आली आहे. आरबीआयच्या संकेतस्थळावर पूर्ण यादी पाहण्यासाठी क्लिक करा

loading image