Bank Holidays: या आठवड्यात बँका चार दिवस राहणार बंद! पाहा यादी

पुढील आठवड्यात देशातील विविध भागातील बँकांना चार दिवस बंद असणार आहेत.
Bank holidays
Bank holidaysesakal
Updated on

Bank Holidays in April 2022: येत्या आठवड्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम असल्यास, तुम्हाला जरा वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण काही शहरांमध्ये वेगवेगळ्या सुट्ट्यांमुळे बँका चार दिवस बंद राहणार आहेत. या आठवड्यात 14, 15, 16 आणि 17 एप्रिल रोजी बँका बंद राहतील. या सुट्यांमध्ये रविवारच्या सुट्टीचाही समावेश आहे. प्रत्येक राज्यासाठी बँक सुट्ट्या वेगळ्या असतात,तर काही दिवस देशभरातील बँका बंद असतात. (Banks remain closed for Four Days next week)

Bank holidays
ईव्हीच्या कर्जाबाबत बँका व फायनान्स संस्था सकारात्मक

या दिवशी बँका असणार बंद-

  • १४ एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती/ महावीर जयंती/ बैसाखी/ तामिळ नववर्ष/ चैरोबा, बिजू उत्सव/ बोहर बिहू

  • 15 एप्रिल – गुड फ्रायडे/बंगाली नववर्ष/हिमाचल डे/विशू/बोहाग बिहू

  • 16 एप्रिल - बोहाग बिहू- (महाराष्ट्रामध्ये या दिवशी बँका चालू असतील. फक्त गुवाहाटीमध्ये बँका बंद असतील.)

  • 17 एप्रिल - रविवार (साप्ताहिक सुट्टी)

Bank holidays
एप्रिल महिन्यात बँका १० दिवस असणार बंद

काय आहेत RBI च्या गाईडलाईन्स-

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, बँकिंग सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमधील विशेष प्रसंगी नोटिफिकेशनवर अवलंबून असतात. या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत.अशा परिस्थितीत, जर तुमच्याकडे बँकेशी संबंधित काम असेल, तर या काळात तुम्ही तुमचे बँकिंग काम नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगद्वारे करु शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com