
पुढील महिन्यात जुलैमध्ये रथयात्रा आणि बकरीद सारखे मोठे सण येत आहेत.
Bank Holidays : जुलैमध्ये 14 दिवस बँका राहणार बंद; पाहा संपूर्ण सुट्ट्यांची यादी
Bank Holidays in July 2022 : जुलै महिन्यात रथयात्रा आणि बकरीद सारखे मोठे सण येत आहेत. त्यामुळं तुमच्याकडं बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असल्यास, ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. प्रत्यक्षात जुलैमध्ये एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India RBI) नं जुलै 2022 च्या बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केलीय. या यादीनुसार पुढील महिन्यात 14 दिवस बँकांमध्ये कोणतंही काम होणार नाहीय.
दरम्यान, जुलैमध्ये देशभरातील सर्वच बँका 14 दिवस बंद राहणार नाहीयत. कारण, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) ठरवलेल्या काही सुट्ट्या प्रादेशिक असतात. वेगवेगळ्या राज्यांच्या सुट्ट्यांची यादीही वेगळी असते. या सुट्ट्या सण किंवा विशेष प्रसंगी अवलंबून असतात. याचा अर्थ या सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू नसून संबंधित राज्यांतील सण किंवा दिवसावर अवलंबून असतात. त्यामुळं काही विशेष दिवशी फक्त काही राज्यांमध्ये बँका बंद राहतील. परंतु, इतर राज्यांमध्ये सर्व बँकिंग कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहील.
हेही वाचा: एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांनी केलं शंभूराज देसाईंचं अभिनंदन; असं नेमकं काय घडलं?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) दरवर्षी बँक हॉलिडे कॅलेंडर जारी करतं, ज्यामध्ये प्रत्येक राज्यात येणाऱ्या बँक सुट्ट्यांची माहिती असते. या कॅलेंडरात राज्यांमध्ये ज्या बँकांच्या शाखा विशेष तारखांना बंद राहतील, त्याबद्दल सांगण्यात आलंय. प्रत्येक दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी आणि सर्व रविवारी देशभरात बँका बंद असतात. याशिवाय, राजपत्रित सुट्टीच्या दिवशीही सर्व बँकांना सुट्टी असते.
हेही वाचा: गुलाबरावांच्या निष्ठेबाबत सहा महिन्यापूर्वीच शंका; पारकरांचा धक्कादायक खुलासा
Bank Holidays in July 2022 : बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी
1 जुलै : कांग (रथजत्रा) / रथयात्रा (भुवनेश्वर, इंफाळ)
3 : रविवार (सार्वजनिक सुट्टी)
7 : (खरची पूजा) : आगरतळ्यात बँका बंद राहणार आहेत.
9 : दुसरा शनिवार
10 : रविवार (सार्वजनिक सुट्टी)
11 : ईद-उल-आझा (जम्मू, श्रीनगर)
13 : भानू जयंती (गंगटोक)
14 : शिलाँगमध्ये बँका बंद राहणार आहेत.
16 : हरेला (डेहराडून)
17 : रविवार (सार्वजनिक सुट्टी)
23 : चौथा शनिवार
24 : रविवार (सार्वजनिक सुट्टी)
26 : केरला पूजा (अगर)
31 : रविवार (सार्वजनिक सुट्टी)
Web Title: Bank Holidays In July 2022 Bank Will Close 14 Days In July 2022 Rbi Check List
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..