बॅंक ऑफ महाराष्ट्रने कर्जावरील व्याजदर घटवले 

bank of maharashtra
bank of maharashtra

पुणे - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ महाराष्ट्रने भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या नवीन धोरणानुसार रेपो रेटशी संलग्न कर्ज व्याजदरामध्ये ७५ बीपीएस कपातीचा संपूर्ण फायदा ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला असून दिनांक ७ एप्रिल २०२० पासून हे घटवलेले व्याजदर लागू होतील. 

यामुळे व्याजदराची जोडलेली किरकोळ कर्जे जसे की गृह, शिक्षण आणि वाहन, तसेच मध्यम-लघु-सूक्ष्म (एमएसएमई) कर्जे आता स्वस्त दरात उपलब्ध होतील. याचा प्रामुख्याने फायदा किरकोळ आणि मध्यम-लघु-सूक्ष्म कर्जधारकांना होईल. बॅंकेने सर्व कालावधीतील फंड आधारित बेंचमार्क व्याजदर सध्याच्या दरापेक्षा २५ बीपीएस अंकांपर्यंत कमी केले आहे. 

आर्थिक वृद्धीला, औद्योगिक विकासाला सहकार्य करणे आणि दरांच्या प्रेषणाला निश्‍चित करणे हे कर्ज व्याजदरांमध्ये घट करण्यामागचे बॅंकेचे लक्ष आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com