bank of baroda
bank of barodasakal

Bank News : PNB आणि बँक ऑफ बडोदाचा ग्राहकांना झटका; RBI च्या घोषणेनंतर घेतला मोठा निर्णय

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात 25 बेसिस पॉईंटची वाढ केल्यानंतर बँकेने हा निर्णय घेतला आहे.
Published on

Interest Rate Hike : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात 25 बेसिस पॉईंटची वाढ केल्यानंतर बँकांकडून व्याजदरात वाढ करण्यात येत आहे. रेपो दरात वाढ केल्यानंतर एचडीएफसी बँकेने लगेचच व्याजदर वाढवण्याची घोषणा केली होती.

आता सार्वजनिक क्षेत्रातील बड्या बँका पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि बँक ऑफ बडोदा (BoB) यांनी कर्जावरील व्याजात 0.25 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. पीएनबी आणि बँक ऑफ बडोदाने रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात 0.25 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

नवे दर 9 फेब्रुवारीपासून लागू :

पीएनबीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत, रेपो रेट आधारित व्याजदर (RLLR) 8.75 टक्क्यांवरून 0.25 टक्क्यांनी वाढवून 9.0 टक्के करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

नवे दर 9 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयने बुधवारी रेपो दर 0.25 टक्क्यांनी वाढवून 6.5 टक्के केला होता.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

BoB ने फंडाचा किरकोळ खर्च आधारित व्याजदर (MCLR) 0.05 टक्क्यांनी वाढवला आहे. बँक ऑफ बडोदा (BoB) ने शेअर बाजाराला सांगितले की, नवीन दर 12 फेब्रुवारीपासून लागू होतील.

हे आहेत नवीन दर :

आता कर्जासाठी MCLR 7.85 टक्क्यांवरून 7.90 टक्के करण्यात आला आहे. एका महिन्यासाठी MCLR 8.15 टक्क्यांवरून 8.20 टक्के करण्यात आला आहे.

bank of baroda
Bill Gates Girlfriend : 67 वर्षांचे बिल गेट्स प्रेमात? जाणून घ्या कोण आहे त्यांची गर्लफ्रेंड

BoB ने तीन महिन्यांच्या कालावधीसाठी कर्जावरील MCLR 8.25 टक्क्यांवरून 8.30 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. त्याचबरोबर एक वर्षाच्या कर्जावरील व्याज आता 8.50 टक्क्यांऐवजी 8.55 टक्के करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com