NCP I राज ठाकरे 'हिंदू जननायक' नाही, तर हिंदू मुस्लिम एकतेचे 'खलनायक' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray

राज ठाकरे यांची औरंगाबादच्या जाहीर सभेत महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली आहे.

राज ठाकरे 'हिंदू जननायक' नाही, तर हिंदू मुस्लिम एकतेचे 'खलनायक'

मागील काही दिवसांपासून मशिदीवरील भोंगे उतरवणे आणि हनुमान चालीसा यावरून राज्याचे राजकारण चांगलंच तापलं आहे. भोंगे उतरवण्यासाठी मनसेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात यावर अनेक उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे. काल राज ठाकरे यांची औरंगाबादला जाहीर सभा झाली यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली आहे. दरम्यान, आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी राज ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. राज ठाकरे हे कसले 'हिंदू जननायक' हे तर हिंदू मुस्लिम एकतेचे 'खलनायक'!, असं म्हणत त्यांनी टीकेची झोड उठवली आहे.

हेही वाचा: वाहतुकीचे नियम मोडल्याचा नेत्यांना फटका; राज ठाकरेंसह अनेकांना हजारोंचा दंड

यासंदर्भात वरपे यांनी एक ट्विट केलं आहे. यात ते म्हणतात, राज ठाकरे हे कसले 'हिंदू जननायक' हे तर हिंदू मुस्लिम एकतेचे 'खलनायक' आहेत. मागील काही दिवसांपासून भोंग्यासंर्भातील भूमिकेमुळे राज ठाकरे सत्ताधाऱ्यांच्या टीकेचे धनी बनले आहेत. दरम्यान, काल औरंगाबाद येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना टोला लगावला होता. शरद पवार (Sharad Pawar) म्हणतायत की, समाजामध्ये मी दुही मजवतोय. पवारांनी कधीतरी छत्रपती शिवाजी महाराजांचा सभेत उल्लेख केला आहे का? यूट्यूबर त्यांची भाषणे आहेत. ती पाहा. नास्तिक म्हटल्याबरोबर त्यांना लागलं, झोंबलं. देवाचे फोटो वगैरे दाखवले, असा टोला ठाकरे यांनी पवारांना लगावला.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरण अनेक घडोमोडींमुळे तापलं आहे. राज्यात मनसे धर्माधर्मांत तेढ निर्माण करत असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. त्यामुळे यात आता राष्ट्र्रवादीने कलेल्या या टीकेला राज ठाकरे काय उत्तर देणार हे पहावे लागणार आहे. राजकीय वातावरण आधीच चिघळलं असताना यामुळे आणखी वाद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा: मी भोळा नाही, मी फसणार नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्ला

Web Title: Ncp Ravikant Varpe Criticism On Raj Thackeray Is Villain Of Hindu Muslim Unity

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top