NPA कस्टमर्सना BOI कडून लोन सेटल करण्यासाठी सुवर्णसंधी!

जर तुमचे लोन अकाऊंट एनपीएमध्ये गेले असेल तर आज ही संधी घालवू नका.
bank of india
bank of indiaesakal
Summary

जर तुमचे लोन अकाऊंट एनपीएमध्ये गेले असेल तर आज ही संधी घालवू नका.

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडिया (Bank of India) आपल्या ग्राहकांना एक उत्तम संधी देत आहे. ज्या ग्राहकांचे कर्ज (Loan) NPA झाले आहे, ते BOI वन टाइम सेटलमेंट स्कीमद्वारे कर्जाच्या रकमेची परतफेड करुन खाते बंद करू शकतात. जर तुमचे लोन अकाऊंट एनपीएमध्ये गेले असेल तर आज ही संधी घालवू नका. आजच्या आज बँकेच्या शाखेत जाऊन सेटलमेंट करा आणि कर्जापासून मुक्ती मिळवा.

bank of india
LIC ने खुल्या बाजारातून BOI मध्ये घेतला 4% हिस्सा; शेअर्सवर काय होणार परिणाम

योजनेंतर्गत सवलत

बँके ऑफ बडोदाने ट्विटरवरही याबाबत माहिती दिली आहे. असे ग्राहक त्यांच्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेत (बेस शाखा) जाऊन त्यांच्या एनपीए खात्याच्या सेटलमेंटच्या वन-टाइम सेटलमेंट योजनेंतर्गत सूटचा लाभ घेऊ शकतात. NPA ग्राहक 5 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांचे NPA खाते सेटल आणि बंद करू शकतात.

एनपीए म्हणजे काय ?

अनेकदा तुम्ही कर्ज घेता पण ते फेडू शकत नाही. तुम्ही बँकेकडून कर्ज घेता तेव्हा बँकेचे कर्ज वेळेवर फेडण्याची जबाबदारी तुमची असते. अनेकदा हफ्ते बाऊंस होतात आणि मग तुम्ही बँकेच्या नॉन परफॉर्मिंग अॅसेट्समध्ये जाता अर्थात एनपीएमध्ये तुमचे लोन अकाऊंट जाते. जेव्हाही तुमचे खाते एनपीएमध्ये जाते, तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही बँकेतून लोन मिळत नाही.

bank of india
BOI सह चार मध्यवर्ती बँकांचं होणार खासगीकरण; जाणून घ्या सरकारची योजना

चांगली सूट

वन टाइम सेटलमेंट (OTS) योजनेअंतर्गत, तुम्ही चांगल्या सवलतींसह कर्जाची परतफेड करू शकता. बँक ऑफ इंडियाने एनपीए ग्राहकांसाठी शाखा न्यायालय स्थापन केले आहे. बँक ऑफ इंडिया कर्ज डिफॉल्टरच्या प्रॉपर्टीचा लिलाव करते. यातून थकित कर्ज वसूल केले जाते. त्यामुळे वन टाइम सेटलमेंट (OTS) योजनेचा फायदा घ्या आणि तुमचे थकीत कर्ज संपवून एनपीए खाते बंद करुन टाका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com