बँकांच्या संपामुळे रु.22 हजार कोटींचे व्यवहार होणार प्रभावित

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : बॅंक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज (मंगळवार) सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे कर्मचारी संप करणार आहेत. "युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्स' (युएफबीयू) या शिखर संघटनेच्या अंतर्गत बॅंक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत. या संपामुळे बॅंकांचे कामकाज ठप्प होण्याची चिन्हे आहेत. मात्र, संपामुळे धनादेश वटणावळीस (चेक क्‍लिअरन्स) अडचणी येण्याची शक्‍यता आहे. संपामुळे 40 हजार धनादेशांचा निपटारा होण्यास अडचण येणार आहे. त्यामुळे सुमारे रु.22 हजार कोटींचे व्यवहार प्रभावित होण्याची शक्यता आहे.

या दरम्यान, खासगी क्षेत्रातील बॅंका आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफ बॅंक, ऍक्‍सिस बॅंaक आणि कोटक महिंद्रा बॅंक, ऍक्‍सिस बॅंक आदी बॅंकांचे कामकाज सुरळीत राहणार आहे.

बॅंक संघटनांच्या मागण्या पुढीलप्रमाणे,

वाढलेल्या थकीत कर्जांसाठी बॅंकांमधील उच्चपदस्थांना जबाबदार धरावे
कर्जवसुलीसाठी कडक उपाययोजना कराव्यात
बॅंकांमध्ये कर्मचारी, अधिकाऱ्यांची पुरेशा प्रमाणात भरती करावी
कर्जबुडव्यांविरुद्ध फौजदारी कारवाई
नोटाबंदीच्या काळात कर्मचाऱ्यांना जास्तीच्या कामाचा भत्ता मिळावा
बॅंक कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतनश्रेणी लागू करण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करावी

Web Title: bank strike 22 cr