सार्वजनिक बॅंकांचा 30, 31 मे रोजी संप

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 मे 2018

मुंबई - वेतनवाढीच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्सने येत्या ३० आणि ३१ मे रोजी सलग ४८ तासांचा देशव्यापी संप घोषित केला आहे. या संपात देशातील १० लाख कर्मचारी आणि अधिकारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे ‘एसबीआय’सह सार्वजनिक बॅंकांची सेवा ठप्प होण्याची शक्‍यता आहे. 

केंद्र सरकारने केवळ दोन टक्के पगारवाढीचा प्रस्ताव बॅंक कर्मचाऱ्यांसमोर ठेवला होता; मात्र युनियन्सने त्याला विरोध केला. बॅंक कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणीनुसार योग्य वेतनवाढ मिळावी आणि इतर सेवा शर्तीत सुधारणेची मागणी युनियन्सने केली आहे. गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारच्या जनधन, मुद्रा, अटल पेन्शन यांसारख्या योजना बॅंकांनी राबविल्या आहेत. त्यामुळे बॅंक प्रशासनाकडून घसघशीत वेतनवाढ मिळेल, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना होती; परंतु बॅंकांची आर्थिक स्थिती ढासळत असल्याचे कारण देत केवळ दोन टक्के पगारवाढीचा प्रस्ताव ठेवून कर्मचाऱ्यांची चेष्टा केल्याचे युनियन्सचे निमंत्रक देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले. कॉर्पोरेट्‌समधील बुडीत कर्जामुळे बॅंकांना तरतूद करावी लागत असून, त्यामुळे बॅंकांचा तोटा वाढला आहे; परंतु बुडीत कर्जाची शिक्षा बॅंक कर्मचाऱ्यांना देणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Web Title: bank strike on 30, 31 may