Bank Strike : पुन्हा संपाचा इशारा ; 'या' दिवशी बँंक कर्मचारी संपावर, महत्वाची कामे उरका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bank strike

Bank Strike : पुन्हा संपाचा इशारा ; 'या' दिवशी बँंक कर्मचारी संपावर, महत्वाची कामे उरका

Bank Strike on 19th November 2022 : शनिवारी म्हणजेच उद्या देशभरातील बँकिंग कामकाजावर परिणाम होऊ शकतो. बँक कर्मचारी शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 रोजी संपावर जाणार आहेत. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने दोन दिवसीय संप पुकारला आहे. संपामुळे चेक क्लिअरिंगला उशीर होऊ शकतो. तसेच एटीएममध्ये रोख रकमेचा तुटवडा जाणवू शकतो.

हेही वाचा : का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI ने 18 नोव्हेंबर 2022 रोजी म्हटले आहे की, आम्हाला इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ने सांगितले आहे की, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) ने एक दिवसीय संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ नोटीस देण्यात आली आहे. एसबीआयने सांगितले की, संपाच्या दिवशी त्यांच्या शाखांमध्ये सामान्य कामकाज सुरू ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत, परंतु संपामुळे काही प्रमाणात कामकाजावर परिणाम होऊ शकतो.

दर महिन्याच्या दुसऱ्या चौथ्या शनिवारी बँक बंद असते. मात्र या महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी संपामुळे बँकिंग सेवेवर परिणाम होणार आहे. शनिवारी बँक कर्मचारी संपावर असतील, तर दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्यांना दोन दिवस बँकांच्या एटीएममध्ये रोकड तुटवड्याचा सामना करावा लागू शकतो.

हेही वाचा: Share Market : 34 हजारात गुंतवणुकदार बनले कोट्यधीश, 'या' शेअरचा छप्परफाड रिटर्न

एआयबीईएचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी सांगितले की, 11 नोव्हेंबर रोजी दिल्लीत मुख्य कामगार आयुक्तांसोबत बैठक झाली. ज्यामध्ये कामगार आयुक्तांनी IBA ला युनियनशी बोलून मार्ग काढण्यास सांगितले होते. मुंबईत आयबीएसोबत युनियनची बैठकही झाली पण मार्ग निघू शकला नाही. त्यांनी सांगितले की, अनेक बँकांमध्ये कर्मचारी कपात केली जात आहे. त्यामुळे नोकरीच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना सूडबुद्धीची वागणूक दिली जात आहे. या कारणांमुळे एआयबीईएला संपावर जाण्याशिवाय पर्याय नाही.