Share Market : 34 हजारात गुंतवणुकदार बनले कोट्यधीश, 'या' शेअरचा छप्परफाड रिटर्न

शेअर मार्केटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत ज्यामध्ये सध्या घसरण होत असली तरी लाँग टर्ममध्ये ते गुंतवणुकदारांसाठी मल्टीबॅगर ठरले आहेत.
Share Market
Share Marketsakal

Share Market : शेअर मार्केटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत ज्यामध्ये सध्या घसरण होत असली तरी लाँग टर्ममध्ये ते गुंतवणुकदारांसाठी मल्टीबॅगर ठरले आहेत. असाच एक स्टॉक आहे बँकिंग फर्म जेएम फायनान्शियलचा (JM Financial). या शेअरने गुंतवणुकदारांना दमदार परतावा दिला आहे. पण 2022 मध्ये आतापर्यंत 4 टक्क्यांहून अधिक कमकुवत झाले आहेत. मात्र लाँग टर्ममध्ये अगदी कमी पैशांच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना त्यांनी कोट्यधीश बनवले आहे. भविष्यात या शेअर्समध्ये तेजीचा कल आहे आणि सध्याच्या किमतीत गुंतवणूक करून 64% नफा मिळू शकतो असा विश्वास बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करत आहे. सध्या त्याचे शेअर्स बीएसईवर 72.50 रुपयांवर ट्रेड करत आहेत. अशातच देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने यामध्ये गुंतवणूकीसाठी 119 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे. कंपनीची मार्केट कॅप 6,922.14 कोटी रुपये आहे.

हेही वाचा : का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

15 नोव्हेंबर 2002 रोजी जेएम फायनान्शियलचे शेअर्स केवळ 27 पैशांना मिळत होते. सध्या, त्याची किंमत 72.50 रुपये आहे. याचा अर्थ 20 वर्षांमध्ये त्याचे शेअर्स सुमारे 302 पट वाढले आहेत. म्हणजे त्यावेळी अवघी 34 हजारांची गुंतवणूक आता एक कोटी रुपयांवर पोहोचली असती. गेल्या वर्षी, त्याचे शेअर्स 18 नोव्हेंबरला 82.55 रुपयांवर होते, जे एका वर्षातील विक्रमी उच्चांक आहे. यानंतर, शेअर्सवर दबाव दिसून आला आणि 16 जून 2022 पर्यंत 31 टक्क्यांनी घसरून 56.95 रुपयांवर आला. गेल्या 52 आठवड्यांतील ही विक्रमी नीचांकी पातळी आहे. यानंतर खरेदी वाढली आणि 27 टक्के वसुली झाली असली, तरी एक वर्षाच्या विक्रमी पातळीपासून ती अजूनही 12 टक्क्यांच्या डिस्काऊंटवर मिळत आहेत.

Share Market
आयआरएफसीच्या शेअर्समध्ये 2 दिवसांत मजबूत वाढ

जुलै-सप्टेंबर 2022 मध्ये कंपनीची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली होती असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आता कंपनीने FY2024 पर्यंत मॉर्गेज लेंडिंग पोर्टफोलिओ दुप्पट करून 15,000 कोटी रुपये करण्याचे टारगेट ठेवले आहे. यामध्ये, होलसेल मॉर्गेजचा हिस्सा 12,000 कोटी आहे. उद्दिष्ट आहे, जो सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत 7,300 कोटी रुपये होता. याशिवाय, किरकोळ गहाणखतांचे लक्ष्य 3,000 कोटी रुपये आहे, जे सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत 1,400 कोटी रुपये होते. कंपनीने म्युच्युअल फंड एयूएम (ऍसेट अंडर मॅनेजमेंट) आर्थिक वर्ष 2025 पर्यंत 25 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे टारगेट आहे, जे जुलै-सप्टेंबर 2022 मध्ये 3030 कोटी रुपये होते. त्यामुळेच ब्रोकरेज फर्मने त्यावर बाय रेटिंग कायम ठेवले आहे आणि त्यावर 119 रुपये टारगेट निश्चित केले आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com