आता सहा महिने तरी, बँकांचा संप होणार नाही! वाचा कारण

वृत्तसंस्था
Friday, 24 April 2020

बँकिंग सेवांचा 6 महिन्यांसाठी 'इंडस्ट्रीयल डिस्प्युट ऍक्ट'अंतर्गत अत्यावश्यक सेवांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.परिणामी 21एप्रिलपासून पुढील 6 महिन्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांना संपावर जाता येणार नाही

नवी दिल्ली : केंद्र सरकारने बँकिंग सेवांचा समावेश पुढील सहा महिन्यांसाठी अत्यावश्यक सेवांमध्ये केला आहे. परिणामी बँक कर्मचाऱ्यांना आणि संघटनांना सहा महिने संपावर जाता येणार नाही. बँकिंग सेवांचा सहा महिन्यांसाठी 'इंडस्ट्रीयल डिस्प्युट ऍक्ट'अंतर्गत अत्यावश्यक सेवांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. परिणामी 21 एप्रिलपासून पुढील सहा महिन्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांना संपावर जाता येणार नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बँक कर्मचारी संघटना प्रबळ असून वेतनवाढ आणि बँकांच्या एकत्रीकरणामुळे होणारी कर्मचारी कपात बघून संप पुकारतात. मात्र लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेची स्थिती नाजुक असून बँक कर्मचाऱ्यांनी येत्या काळात संप पुकारल्यास अर्थव्यवस्थेला आणखी धक्का बसू शकतो. केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक सेवा विभागाने 20 एप्रिल रोजी याविषयी परिपत्रक काढले आहे. तसेच श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या माध्यमातून देखील बँकिंग सेवांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करण्यात आल्या असल्याचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. ते सर्व बँकांच्या अध्यक्षांना देखील पाठविण्यात आले आहे. 

बाप रे! देशातील तब्बल एवढ्या जणांनी गमावला रोजगार

सध्या बँकिंग क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांशी निगडित अनेक समस्या आहेत. एक एप्रिल रोजी झालेल्या बँकांच्या विलीनीकरणामुळे अनेक बँक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी व्यक्त केली आहे. मात्र कोणत्याही कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: banking now essential service workers could not strike for six months