
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे (सीएमआयई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी ही माहिती दिली आहे. देशभरात लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आलेले आहे. त्यामुळे रोजगारावर त्याचा आणखी विपरित परिणाम होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात ४० टक्के असलेला रोजगार दर एप्रिल महिन्यात घसरून २६ टक्क्यांवर आला आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये यात १४ टक्क्यांची घसरण झाली आहे.
नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाउन आहे. त्यामुळे बहुतांश उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. याचा फटका बसत एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात बेरोजगारी दर वाढून २६.२ टक्क्यांवर पोचला आहे.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे (सीएमआयई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी ही माहिती दिली आहे. देशभरात लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आलेले आहे. त्यामुळे रोजगारावर त्याचा आणखी विपरित परिणाम होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात ४० टक्के असलेला रोजगार दर एप्रिल महिन्यात घसरून २६ टक्क्यांवर आला आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये यात १४ टक्क्यांची घसरण झाली आहे. याचाच अर्थ देशातील १४ टक्के कर्मचारी किंवा कामगारांनी रोजगार गमावला आहे. बेरोजगारांची संख्या कोट्यवधींमध्ये आहे.
देशातील १४ कोटी नागरिकांनी लॉकडाउनच्या कालावधीत रोजगार गमावल्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे रोजगार दरही घसरला आहे. गेल्या आठवड्यात २७ टक्क्यांवर असलेला रोजगारदर २६.२ टक्क्यांवर आला आहे. शहरी आणि ग्रामीण भागात नागरिकांनी रोजगार गमावला आहे. ग्रामीण भारतातील बेरोजगारी दर २६.७ टक्के आहे तर, शहरी भागातील बेरोजगारी दर २५.१ टक्क्यांवर पोचला आहे.