बँकांच्या व्यवहारासाठी सोमवारपर्यंत एकच दिवस

वृत्तसंस्था
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

येत्या शुक्रवारी बँकांमध्ये पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी मोठी झुंबड उडण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा मंगळवारी मध्यरात्रीपासून चलनातून बंद करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. याशिवाय आज (बुधवार) सार्वजनिक खाजगी क्षेत्रातील सर्वच बॅंका तसेच पतसंस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. आज बँकांचे एटीएम देखील बंद राहणार आहेत. काही ठराविक एटीएम उद्या म्हणजे 10 नोव्हेंबर रोजी देखील बंद ठेवण्यात येणार आहेत. चालू आठवड्यात बँकांना देखील सलग सुट्या येणार असल्याने लोकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

बॅंका आज आणि उद्या बंद राहणार आहेत. फक्त 11 नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारी बॅंका नियमित कामकाजासाठी खुल्या राहणार आहेत. त्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी दुसरा शनिवार आल्याने बँकांचे व्यवहार बंद राहणार आहे. त्यानंतर रविवारी आणि सोमवारी गुरूनानक जयंती आल्याने देखील बँकांचे सर्व व्यवहार बंद राहणार आहे. त्यामुळे चालू आठवड्यात फक्त 1 दिवस बँकांचे कामकाज सुरू राहणार आहे. 
 
येत्या शुक्रवारी बँकांमध्ये पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी मोठी झुंबड उडण्याची शक्यता आहे. 

- दररोज पैसे काढण्याची मर्यादा 10 हजार
- आठवड्याला पैसे काढण्याची मर्यादा 20 हजार
- सरकारी रुग्णालये, आंतरराष्ट्रीय विमातळांचा काही प्रमाणात अपवाद
- 9 नोव्हेंबरपर्यंत एटीएम बंद
- काही भागात एटीएम 10 नोव्हेंबरपर्यंत बंद
- बॅंका, टपाल कार्यालयांत नोटा बदलून मिळणार
- नोटा जमा करण्यासाठी पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र आवश्‍यक
- नागरिकांना 11 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बँका व पोस्ट ऑफिसमध्ये जमा करता येतील.

- नव्या पाचशे आणि व दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा ११ नोव्हेंबरपासून मिळणार

Web Title: Banks closed for 5 days in coming days