मार्च अखेरीमुळे रविवारी बँका चालू राहणार

वृत्तसंस्था
Wednesday, 27 March 2019

रिझर्व्ह बँकेने एक परिपत्रक काढून सर्व सरकारी बँकांना तसे निर्देश दिले आहेत. त्यात सर्व पे अँड अकाऊंट कार्यालय सुरू राहणार असल्याने ३१ मार्च २०१९ रोजी सर्व सरकारी बँका सुरू ठेवण्यात याव्यात, असे म्हटले आहे.

मुंबई : चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे ३१ मार्च येत्या रविवारी येत आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने सरकारी कामकाजासाठी देवाण-घेवाण करणाऱ्या देशभरातील सर्व बँका रविवारी सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

रिझर्व्ह बँकेने एक परिपत्रक काढून सर्व सरकारी बँकांना तसे निर्देश दिले आहेत. त्यात सर्व पे अँड अकाऊंट कार्यालय सुरू राहणार असल्याने ३१ मार्च २०१९ रोजी सर्व सरकारी बँका सुरू ठेवण्यात याव्यात, असे म्हटले आहे.

या बँकाच्या शाखांमधील देवाण-घेवाणीचे व्यवहार ३० मार्च रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते ३१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच RTGS आणि NEFT सहित इलेक्ट्रॉनिक देवाण-घेवाणीची वेळही ३० आणि ३१ मार्च रोजी वाढविण्यात आलेल्या वेळेपर्यंत सुरू राहणार असल्याचेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: banks open on 31 march sunday in India