बँकांनी पासबुकमध्ये व्यवहाराची संपूर्ण माहिती द्या: आरबीआय

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 जून 2017

मुंबई: रिझर्व्ह बॅंकेने देशातील सर्व बँकांना ग्राहकाने केलेल्या सर्व व्यवहारांची तपशीलवार माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. जेणेकरून ग्राहक आपण केलेल्या व्यवहाराची पुन्हा तपासणी करू शकतील. शिवाय आरबीआयने पासबुकमधील डेबिट/क्रेडिटबद्दलची संपूर्ण माहिती बँकांनी ग्राहकांना द्यावी असा आदेश देखील काढला आहे.

आरबीआयने नव्या परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, सर्व बँकांनी ग्राहकांना पासबुकमधील सर्व व्यवहारांची विस्तारपूर्वक माहिती द्यावी. अपूर्ण अथवा अर्धवट शब्दात थोडी माहिती न देता संपूर्ण माहिती देण्याचे सांगितले आहे. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाला बँकेच्या खात्यामधील नोंदीं समजून घेताना कोणतीही अडचण न येता तो केलेल्या व्यवहाराची माहिती घेऊ शकेल.

आरबीआयच्या आता नव्या आदेशामुळे सर्व ग्राहकांना अगदी सोप्या भाषेत माहिती मिळणार आहे. सध्या बर्‍याच बॅंका पासबुकमध्ये बॅंकेच्या पारिभाषेत नोंदी करतात. त्यामुळे सामान्य ग्राहकांना त्या खात्यातील नोंदी लक्षात येत नाहीत. बँकांकडून ग्राहकांना व्यवहाराची पद्धत, शुल्काचा प्रकार (शुल्क / कमिशन / दंड / दंडाप्रमाणे) आणि कर्ज खाते क्रमांक अश्या विविध प्रकारच्या खात्यातील नोंदींची माहिती पुरवली जाते.

Web Title: Banks should give complete information about transactions in passbooks: RBI

टॅग्स