बॅंका सलग तीन दिवस बंद राहणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 जून 2017

पुणे: बॅंकेशीसंबंधित कामे आजच (शुक्रवार) उरकून घ्या. कारण बॅंका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. उद्या महिन्यातील चौथा शनिवार असल्यामुळे बँकांना 24 जून रोजी सुट्टी राहणार आहे आणि त्यानंतर 25 जून रोजी रविवार असल्याने बँकांना सुट्टी आहे. तर सोमवारी ईद असल्यामुळे बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.

शेअर बाजार देखील सोमवारी रमजान ईद असल्यामुळे बंद राहणार आहे. मात्र मंगळवारी शेअर बाजार आणि बँकांचे नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू असतील.

कॅशलेस व्यवहारांना द्या प्राधान्य:
लोकांनी जास्तीत-जास्त ठिकाणी कॅशलेस व्यवहार करावेत. त्यामुळे रोखीची समस्या निर्माण होणार नाही. बँकांचे सर्व व्यवहार 'ऑनलाईन' आणि 'डिजिटल' माध्यमातून होत असल्याने बॅंका सलग तीन दिवस बंद राहणार असल्यातरी प्रभाव जास्त जाणवणार नाही. मात्र ईद असल्यामुळे नागरिकांची खरेदीसाठी बाजारात गर्दी होणार असल्यामुळे एटीएममध्ये पैसे काढणा-यांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. असल्यामुळे एटीएममध्ये पैशांची कमतरता भासू शकते. बँकांच्या मते, पुरेसे पैसे एटीएममध्ये उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. शिवाय नागरिकांनी डिजिटल व्यवहारांना प्राधान्य द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Banks will be closed for next three days