‘बाटा’चा नफा 16 टक्के घसरणीसह रु.38 कोटींवर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली: फूटवेअर क्षेत्रातील कंपनी बाटा इंडियाचा नफा डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत 15.84 टक्के घसरणीसह 37.71 कोटी रुपयांवर पोचला आहे. याअगोदरच्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीत कंपनीला 44.81 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.

मात्र, कंपनीच्या एकुण विक्रीत 2.41 टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान, कंपनीने 640.19 कोटी रुपयांची विक्री केली आहे. त्याअगोदरच्या वर्षातील याच तिमाहीत कंपनीने एकुण 625.09 कोटी रुपयांची विक्री केली होती. कंपनीच्या एकुण खर्चात 2.55 टक्क्यांची वाढ झाली आहे. सरलेल्या तिमाहीत कंपनीने 581.26 कोटी रुपयांचा खर्च केला आहे.

मुंबई शेअर बाजारात बाटा इंडियाचा शेअर सध्या(11 वाजून 45 मिनिटे) 503.60 रुपयांवर व्यवहार करत असून 0.92 टक्क्याने वधारला आहे.

Web Title: bata's profit declines