अवघ्या 25 हजारात बिझनेसमन व्हा अन् महिन्याला 3 लाख कमवा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

business

तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे, पण फार भांडवल नाही तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.

अवघ्या 25 हजारात बिझनेसमन व्हा अन् महिन्याला 3 लाख कमवा!

sakal_logo
By
शिल्पा गुजर

मोत्यांची शेती (Pearl farming) हा एक अतिशय चांगला व्यवसाय आहे. शहरी भागात तर अनेकांना याची माहितीही नाही. पण, गेल्या काही वर्षांत याकडे लक्ष वेधले आहे, कारण या व्यवसायासाठी सरकार अनुदानही देते.

तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे, पण फार भांडवल नाही तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण हा असा व्यवसाय ज्यामध्ये गुंतवणूक कमी आहे आणि कमाई भरपूर आहे. फक्त 25000 रुपये गुंतवून तु्म्ही दरमहा 3 लाख रुपयांपर्यंत कमाई करु शकता. हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू करायचा असेल, तर केंद्र सरकारकडून ५० टक्के अनुदानही मिळते.

हेही वाचा: लवकरच लॉंच होणार स्टार हेल्थचा IPO! अधिक जाणून घ्या

मोती शेती (Pearl farming) हा व्यवसाय शहरी भागात तर अनेकांना याची माहित नसेल. पण, गेल्या काही वर्षांत याकडे लक्ष वेधले आहे. गुजरातमधल्या काही भागात याच्या लागवडीमुळे अनेक शेतकरी लखपती झालेत. त्याच वेळी, ओडिशा आणि बंगळुरूमध्येही याला चांगला वाव आहे. मोत्यांच्या शेतीतून (Pearl farming) मिळणारी कमाई प्रचंड आहे.

मोत्यांच्या शेतीसाठी काय आवश्यक?

मोत्यांच्या लागवडीसाठी तलावाची आवश्यकता आहे. यामध्ये ऑयस्टरची भूमिका महत्त्वाची आहे. मोती लागवडीसाठी राज्यस्तरावर प्रशिक्षणही दिले जाते. तलाव नसेल तर त्याचीही व्यवस्था करता येईल. तुमच्या गुंतवणुकीवर तुम्ही सरकारकडून 50 टक्के सबसिडी मिळवू शकता. दक्षिण भारत आणि बिहारमधील दरभंगाच्या ऑयस्टरची क्वालिटी खूप चांगली आहे.

हेही वाचा: आयटी, ऑटो आणि एफएमसीजी शेअर्सना फटका! आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

कशी सुरु कराल शेती?

शेती सुरू करण्यासाठी कुशल शास्त्रज्ञांकडून प्रशिक्षण घ्यावे लागते. अनेक संस्थांमध्ये सरकार स्वत: मोफत प्रशिक्षण देते. सरकारी संस्था किंवा मच्छिमारांकडून ऑयस्टर (Oyster) खरेदी करून शेती सुरू करा. तलावाच्या पाण्यात शिंपले दोन दिवस ठेवले जातात. सूर्यप्रकाश आणि वाऱ्याच्या संपर्कात आल्यानंतर ऑयस्टरचे (Oyster) कवच आणि स्नायू सैल होतात. जेव्हा स्नायू सैल होतात तेव्हा ऑयस्टरची (Oyster) शस्त्रक्रिया करून त्याच्या आत एक साचा टाकला जातो. जेव्हा साचा ऑयस्टरला (Oyster) टोचतो तेव्हा आतून एक पदार्थ बाहेर येतो. काही काळानंतर, साचा मोत्याच्या (Pearl) आकारात तयार होतो. मोल्डमध्ये कोणताही आकार टाकून तुम्ही त्याच्या डिझाइनचा मोती तयार करू शकता. डिझायनर मोत्यांना बाजारात जास्त मागणी आहे.

दरमहा किती कमावणार ?

एक ऑयस्टर (Oyster) तयार करण्यासाठी सुमारे 25 ते 35 रुपये खर्च येतो. त्याच वेळी, एका ऑयस्टरपासून 2 मोती तयार केले जातात. एका मोत्याची किंमत सुमारे 120 रुपये आहे. जर गुणवत्ता चांगली असेल तर तुम्हाला 200 रुपयेही मिळू शकते. एक एकर तलावात 25 हजार ऑयस्टर टाकता येतात. यावर तुमची गुंतवणूक सुमारे 8 लाख रुपये असेल. जर 50 टक्के शिंपले देखील चांगले निघाले आणि ते बाजारात आणले गेले तर एखाद्याला वर्षाला 30 लाख रुपयांपर्यंत सहज कमाई होऊ शकते.

नोंद - कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top