बाजाराची सुरुवात किंचित नकारात्मक

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारातील नकारात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराची आज(सोमवार) किंचित नकारात्मक सुरुवात झाली. सेन्सेक्स सुमारे 40 अंशांनी कोसळला होता तर निफ्टीची 8350 अंशांच्या खाली सुरुवात झाली. मात्र, काही वेळातच सेन्सेक्सने उभारी घेत 50 अंशांची वाढ नोंदवली तर निफ्टीने 8350 अंशांची पातळी पार केली.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर आज आशियाई बाजारांनी सावध पवित्रा घेतला आहे. दरम्यान, डॉलरच्या मूल्यातदेखील घसरण झाली आहे.

बाजारात बँकिंग, कॅपिटल गूड्स, हेल्थकेअर, आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात घसरण झाली आहे. याऊलट, इतर क्षेत्रांमध्ये तेजीसह व्यवहार सुरु आहे. निफ्टीवर ओएनजीसी, हिंडाल्को, अल्ट्राटेक सिमेंट, ग्रासिम आणि गेलचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर आयसीआयसीआय बँक, अरबिंदो फार्मा, अॅक्सिस बँक, भारती एअरटेल आणि आयडिया सेल्युलरचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत.

Web Title: In the beginning market some negative