...म्हणून बँकांपेक्षा पोस्टात Savings खात उघडणे अधिक फायद्याच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

post office

कारण पोस्टात तुम्हाला इतर बँकांच्या तुलनेत अधिक व्याज मिळते.

...म्हणून बँकांपेक्षा पोस्टात Savings खात उघडणे अधिक फायद्याच

पोस्ट ऑफिस बचत खाते ( Post Office Savings Account): तुम्ही फक्त 500 रुपयांमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडू शकता. खात्यात पैसे जमा करण्यासाठी कोणतीही कमाल मर्यादा (Maximum Limit) नाही.

जर तुम्ही बँकांच्या बचत खात्यावर (Savings Account) नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की अनेक बँका त्यांच्या बचत खात्यावर फारच कमी व्याज देत आहेत. अशा वेळी, तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये बचत बँक खाते उघडू शकता ( Post Office Savings Account opening). कारण पोस्टात तुम्हाला इतर बँकांच्या तुलनेत अधिक व्याज मिळते आणि खात्यात जमा केलेल्या पैशाच्या सुरक्षेची हमी भारत सरकारकडून दिली जाते.

हेही वाचा: आयएसजीईसी हेवी इंजिनीअरिंग लिमिटेडच्या शेअर्समध्ये गुंतवा!

- कोण सुरु करु शकते पोस्टात खाते ?

वैयक्तिक, दोन संयुक्त, अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने पालक, मानसिकदृष्ट्या कमजोर व्यक्तीच्या किंवा लहान पाल्याच्या वतीने पालक म्हणूनही तुम्ही खाते उघडू शकता. जर एखादा व्यक्ती 10 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचा असेल तर तो स्वत:च्या नावाने एकच खाते उघडू शकतो. संयुक्त खात्यात (Joint account) दोघांचा शेअर समान असेल आणि एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्याला त्या खात्याचे पूर्ण अधिकार मिळतात. तो ते संयुक्त खाते पुढे चालवू शकतो पण पोस्टात त्याचे स्वतंत्र खाते नसावे. तसे असल्यास खाते बंद करावे लागेल.

- किमान 500 रुपयांमध्ये खाते उघडता येते

तुम्ही फक्त 500 रुपयांमध्ये पोस्ट ऑफिस बचत खाते उघडू शकता. खात्यात पैसे जमा करण्यासाठी कमाल मर्यादा नाही. पोस्ट ऑफिस बचत खात्यात जमा केलेल्या पैशावर ग्राहकाला वार्षिक 4 टक्के व्याज मिळते. तुम्ही इथे फक्त एकच खाते उघडू शकता. खात्यातून किमान 50 रुपये काढता येतात. खात्यात किमान 500 रुपये शिल्लक ठेवणे आवश्यक आहे.

हेही वाचा: सावधान! फसवणुकीबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना इशारा

- व्याज आणि कर सूट

व्याजाचे कलक्युलेशन कसे केले जाते ते बघुया, जर महिन्याच्या 10 व्या आणि शेवटच्या दिवसातील शिल्लक रु. पेक्षा कमी असेल तर कोणत्याही महिन्यात कोणतेही व्याज दिले जाणार नाही. आयकराच्या कलम 80TTA नुसार, सर्व बचत बँक खात्यांना एका वर्षात 10,000 रुपयांपर्यंतच्या व्याजावरील उत्पन्नावर कर सूट मिळू शकते.

- आणखी कोणत्या सुविधा ?

चेकबुक, एटीएम कार्ड, इंटरनेट बँकिंग/मोबाईल बँकिंग, आधार सीडिंग, अटल पेन्शन योजना (APY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) चे लाभ देखील घेता येतील. पण यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल.

loading image
go to top