आयएसजीईसी हेवी इंजिनीअरिंग लिमिटेडच्या शेअर्समध्ये गुंतवा! मिळवा भरघोस परतावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ISGEC Heavy Engineering Ltd

फॉर्च्यून इंडिया 500 लिस्टमध्ये आयएसजीईसी हेवी इंजिनीअरिंग लिमिटेड 236 व्या क्रमांकावर आहे.

आयएसजीईसी हेवी इंजिनीअरिंग लिमिटेडच्या शेअर्समध्ये गुंतवा!

आयएसजीईसी हेवी इंजिनीअरिंग लिमिटेड (ISGEC Heavy Engineering Ltd) येत्या काळात अतिशय तेजीत येईल, असा विश्वास ब्रोकिंग फर्म शेअरखानला आहे. सध्या हा शेअर ज्या पातळीवर आहे त्यापासून पुढे आणखी 45 टक्क्यांची वाढ होऊ शकते, असे ब्रोकिंग हाऊसचे म्हणणे आहे. फॉर्च्यून इंडिया 500 लिस्टमध्ये आयएसजीईसी हेवी इंजिनीअरिंग लिमिटेड (ISGEC Heavy Engineering Ltd) 236 व्या क्रमांकावर आहे. कंपनी ईपीसी प्रकल्प, बॉयलर, स्टील कास्टिंग, शुगर प्रोजेक्ट, डिस्टिलरीज, वायू प्रदूषण नियंत्रण भाग, कंत्राटी उत्पादन यासारख्या व्यवसायात आहे, असे शेअरखानने म्हटले.

हेही वाचा: ऑईल अँड गॅस सेक्टरमधील 'हे' 3 शेअर्स देतील भरघोस परतावा

जगातील सर्व मोठ्या कंपन्या त्याच्या ग्राहक यादीत आहेत. अलस्टॉम (Alstom), जपान (Japan), ब्रिटिशपेट्रोलियम (British Petroleum), लर्गी (Lurgi), फॉस्टर व्हीलर (Foster Wheeler), नॉर्थअमेरिका (North America), ओशिबा (oshiba), फ्लूओर ( Fluor), Valeo, फ्रान्स (France), जी एम मेक्सिको ( GM Mexico) सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.

हेही वाचा: शॉर्ट टर्मसाठी फ्युचर्स मार्केटचे 'हे' 2 शेअर्स देतील मजबूत कमाई

कंपनीचे उत्पादन युनिट 100 एकर क्षेत्रात पसरलेले आहे. जिथे जागतिक दर्जाची उत्पादने आणि चाचणी सुविधा उपलब्ध आहेत. कंपनीची ऑर्डर बुक खूप मजबूत आहे. सध्या कंपनीकडे 7518 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत.

कंपनीच्या ऑपरेटिंग नफ्याच्या मार्जिनवर पुढील 1-2 तिमाहीत काही दबाव दिसून येईल, पण वस्तूंच्या किमतीत आणखी घट आणि नवीन ऑर्डरचा ओघ यामुळे OPM ​​वरील दबाव दूर होईल असे शेअरखानने म्हटले. यापुढे देशांतर्गत आणि परदेशातील दोन्ही बाजारांत मागणी मजबूत होण्याची अपेक्षा आहे. यामुळे कंपनीच्या व्यवसायाला आणखी चालना मिळेल. याशिवाय, फिलीपिन्समध्ये असलेल्या कंपनीच्या प्लांटमधून स्टॉकचे रिरेटिंग देखील पाहिले जाईल. हे लक्षात घेऊन हा शेअर ४५ टक्के टारगेट ठेवून खरेदी करणे योग्य ठरेल असे शेअरखानने म्हटले.

loading image
go to top