'भारतामध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ'

पीटीआय
Saturday, 17 October 2020

परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय डिजिटलच्या ग्राहक विभागातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी. कारण, कोरोना विषाणूंच्या साथीच्या आजारानंतर हा विभाग सर्वांत मजबूत बनत आहे.

नवी दिल्ली - परदेशी गुंतवणूकदारांना भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी सध्या योग्य काळ आहे, असे मत कोटक महिंद्रा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक यांनी व्यक्त केले. ब्लूमबर्ग इंडिया इकॉनॉमिक शिखर परिषदेत ते बोलत होते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोटक म्हणाले, की परदेशी गुंतवणूकदारांसाठी भारतात गुंतवणूक करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय डिजिटलच्या ग्राहक विभागातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी. कारण, कोरोना विषाणूंच्या साथीच्या आजारानंतर हा विभाग सर्वांत मजबूत बनत आहे.ते म्हणाले, ‘‘आव्हानात्मक परिस्थिती असते तेव्हा तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे. भारतात गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम क्षेत्र म्हणजे डिजिटल कंपन्या, ई-कॉमर्स, तंत्रज्ञान कंपन्या, फार्मा आणि ग्राहक विभागातील कंपन्या.आरोग्य क्षेत्रात गुंतवणुकीत आधीच वाढ दिसून येत आहे. येत्या काळात भारतातील खासगी बँकांचा बाजारातील हिस्सा ५० टक्क्यांपर्यंत वाढेल, जो सध्या ३५ टक्के आहे. गेल्या वर्षी खासगी बँकांच्या शेअरमध्ये २० टक्के घट झाली होती, तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअरमध्ये ४१ टक्के घट झाली आहे.’’ 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This is the best time for foreign investors to invest in India