SBI कर्मचाऱ्यांसाठी बँकेचे चेअरमन रजनीश कुमार यांची मोठी घोषणा...

सुमित बागुल
Wednesday, 15 July 2020

मिशन बिगिन अगेन जरी सुरु झालं असलं तरीही तुम्ही आम्ही अजूनही घरूनच काम करतोय.

नवी दिल्ली : गुगल फेसबुक यासारख्या मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना २०२० च्या वर्षाअखेरपर्यंत वर्क फ्रॉम होमची मुभा दिलीये. मिशन बिगिन अगेन जरी सुरु झालं असलं तरीही तुम्ही आम्ही अजूनही घरूनच काम करतोय. अशात आता वर्क फ्रॉम होम नव्हे तर आता त्यापुढे जात 'कुठूनही काम' करण्याची मुभा म्हणजेच 'Work From Anywhere' ची मुभा स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्याचं समजतंय. 

कोरोना संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी भारतातील सर्वात मोठ्या बँकेने म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेतलाय. नुकतीच SBI ची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली यामध्ये  SBI चे चेअरमन रजनीश कुमार यांनी याबाबत माहिती दिलीये.

INSIDE STORY : कोरोना संशोधनातील नवीन निष्कर्ष; समोर आलीये 'ही' मोठी माहिती...

सध्या बँकेचं संपूर्ण लक्ष्य बँकेचा खर्च कमी करण्यावर म्हणजेच कॉस्ट कटिंगवर आहे. सोबतच येत्या काळात कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कशी वाढेल यावर देखील आम्ही भर देणार असल्याचं बँकेचे चेअरमन म्हणालेत. Work From Anywhere च्या निर्णयामुळे SBI चे तब्बल एक हजार कोटी वाचतील असा अंदाज लावण्यात येतोय. 

इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल ऍप्लिकेशनवर भर : 

२०२० - २०२१ हे वर्ष इतर बँकांप्रमाणे SBI साठी देखील खडतर असणार आहे, मात्र ग्राहकांच्या मदतीसाठी SBI कटिबद्ध आहे. येत्या काळात इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल ऍप्लिकेशनवर अधिक भर देण्यात येणार आहे.  

beyond work from home SBI to allow their employees to work from anywhere


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: beyond work from home SBI to allow their employees to work from anywhere