INSIDE STORY : कोरोना संशोधनातील नवीन निष्कर्ष; समोर आलीये 'ही' मोठी माहिती...

INSIDE STORY : कोरोना संशोधनातील नवीन निष्कर्ष; समोर आलीये 'ही'  मोठी माहिती...

मुंबई : कोरोना संसर्ग जगभरात चिंतेचा विषय ठरलाय. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा धडकी भरवणारा आहे. जगातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे हे संक्रमण रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात जरी येत असली तरीही मुंबई आसपासच्या शहरांवरील कोरोनाचं संकट गडद होत जातंय. महाराष्ट्रात आणि देशातही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येतायत.   

मात्र नुकत्याच केलेल्या संशोधनात कोरोना विषाणू कमजोर झाल्याचे समोर येत आहे. यावर लस बनवण्याची देखील हीच योग्य वेळ असल्याचे ही सांगितले जात आहे. कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी 'हर्ड इंम्युनिटी' वर देखील चर्चा करण्यात आली. मात्र त्यासाठी 70 टक्के लोकसंख्या प्रभावित असणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र नवीन संशोधनानुसार 10 ते 15 टक्के लोकसंख्या बाधित झाल्यास विषाणूला नियंत्रणात आणण्यात यश मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आतापर्यंत झालेल्या संशोधनात एकूण लोकसंख्यपैकी 60 ते 70 टक्के लोकसंख्या बाधित झाली तर हर्ड इंम्युनिटी म्हणजेच सामूहिक प्रतिकारशक्ती विकसित होत असल्याचे सांगण्यात आले होते. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी तसेच व्हर्जिनीटी टेक युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार आता केवळ 10 ते 15 टक्के लोकसंख्या बाधित झाली तरी विषाणू दिवसेंदिवस कमजोर होत जाईल. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.

संशोधकांनी यासाठी स्वीडन देशातील एकूण स्थितीचा अभ्यास करून निष्कर्ष काढला आहे. कोरोना संसर्ग पसरल्यानंतर जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊन सुरू केले. मात्र स्वीडन ने आपल्या देशात लॉकडाऊन घेतला नाही. परिणामी सुरुवातीला बाधित रुग्णांची संख्या वाढली. मृतांचा आकडा ही मोठा होता.नंतर मात्र रुग्णांच्या संख्येत घट झाली इतकेच नाही तर मृतांचा आकडा ही कमी झाला. आता दररोज केवळ 100 रुग्ण सापडत असून त्यातील 5 पेक्षा कमी लोकांचा मृत्यू होत आहे. संशोधकांच्या अनुसार तिथल्या लोकांमधील इम्युनिटी पॉवर विकसित झाली आहे. त्यामुळे आकडा कमी होत आहे. यामुळे विषाणू कमजोर होत असल्याचे ही काही संशोधकांनी सांगितले.

जेव्हा स्वीडन मध्ये 7.3 टक्के लोकसंख्या संक्रमित झाली तेव्हा देशात 5,280 मृत्यू झाले होते मात्र 14 टक्के संक्रमण होईपर्यंत मृतांचा आकडा खूपच कमी झाला होता. त्यामुळे 10 ते 15 टक्के लोकसंख्येत संक्रमण झाल्याने विषाणू आपली ताकद गमावत असल्याचे ही संशोधनातून पुढे आले आहे.

स्वीडन देशातील हर्ड इंम्युनिटी कमी झाल्याचे उदाहरण स्पेनमध्ये मात्र लागू झालं नाही. युरोपमधील स्पेन हा देश कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर संक्रमित झाला होता. मात्र स्पेनमध्ये केवळ 5 टक्के लोकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती विकसित झाली. तर 95 टक्के लोकं या विषाणूच्या प्रति असंवेदनशील असल्याचे दिसले. त्यामुळे केवळ हर्ड इम्युनिटीच्या बळावर कोरोना संक्रमणाचा सामना होऊ शकत नाही. 

जगभरातील संक्रमण वेगाने वाढत असून मृत्यू देखील होतायत. मात्र असं असलं तरीही या संक्रमानातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वेगाने वाढत आहे. फेमिफ्ल्यू, डेक्सामेथासन यासारखी औषधं मोठ्या प्रणावर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध  असल्याने रुग्ण बरे ही होत आहेत. बाधित रुग्णांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होत आहेत. बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरातील प्लाझ्माचा उपयोग करून त्याचा फायदा रुग्णांना होत आहे. मात्र बरं झालेल्या रुग्णांना दुसऱ्यांदा कोरोना लागण होत असल्याचे ही संशोधनात समोर आले आहे. याचा अर्थ आजारातून बरे झाल्यानंतर काही दिवसांनी रुग्णालयातील रोगप्रतिकार शक्ती कमजोर होत असल्याचे समोर आले आहे. यावर लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे ही संशोधकांनी सुचवले आहे.

किंग्स कॉलेज ऑफ लंडनमधील संशोधकांनी यापूर्वी 90 पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्णांच्या अँटीबॉडीज चा अभ्यास करून त्यांच्यात होणाऱ्या बदलांबाबत निष्कर्ष नोंदवले होते. या रुग्णांची रक्त चाचणी ही करण्यात आली होती. त्यानुसार केवळ सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांमध्ये विषाणूला रोखू शकणारे अँटीबीडीज असल्याचे स्पष्ट झाले. त्यातील 60 टक्के रुग्णांमध्ये संक्रमणाच्यानंतर काही आठवडे विषाणूला प्रतिरोध करणारी प्रतिक्रिया नोंदवली गेली. तीन महिन्यानंतर केवळ 16.7 टक्के रुग्ण कोरोना विषाणूला रोखू शकेल अशी अँटीबॉडीज कायम ठेवली असल्याचे निदर्शनास आले. तर 90 दिवसांनंतर काही रुग्णांच्या शरीरात संशोधनापुरत्या देखील अँटीबॉडीज  नव्हत्या. त्यामुळे अश्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने पुन्हा एकदा त्यांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता असल्याचे सांगितले.

संशोधकांनुसार कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये पुढील दोन आठवडे कायम असतो. त्यामुळे अन्य व्यक्तींना ही संक्रमणाचा धोका निर्माण होऊ शकतो. जेव्हा एखादं संक्रमण पसरतं तेव्हा शरीरात त्याला विरोध करणारे अँटिबॉडीज तयार होतात त्यामुळे विषाणूंचे संक्रमण कमी होण्यास मदत होते.

( संकलन - सुमित बागुल )  

researchers all over world found few new things about corona and herd immunity read inside story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com