esakal | गुंतवणुकीची "केमिस्ट्री' कोठे जुळेल? 
sakal

बोलून बातमी शोधा

investment-chemistry

अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बाजाराचे; तसेच शेअर्सचे विश्‍लेषण केले आहे. ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करताना जोखीम ओळखून वैयक्तिक आर्थिक सल्लागाराकडून सल्ला घेऊन व्यवहार करणे योग्य ठरेल.

गुंतवणुकीची "केमिस्ट्री' कोठे जुळेल? 

sakal_logo
By
भूषण गोडबोले

गेल्या आठवड्यात "सेन्सेक्‍स' 37,877 अंशांवर; तर "निफ्टी' 11,178 अंशांवर बंद झाला. शुक्रवारी "सेन्सेक्‍स'ने 433 अंशांची, तसेच "निफ्टी'ने 122 अंशांची घसरण दर्शविली. शॉर्टटर्म आलेखानुसार 36,911 ही "सेन्सेक्‍स'साठी, तर 10,882 ही "निफ्टी'साठी महत्त्वाची आधार पातळी आहे. गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या किरकोळ किमतीवर आधारित महागाई निर्देशांकाने जून-जुलै वाढ नोंदविली आहे. कोरोना आणि लॉकडाउनचा विचार करून आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारला रिझर्व्ह बॅंकेने 57,128 कोटी रुपयांचा लाभांश देण्याचा प्रस्ताव शुक्रवारी मंजूर झाला आहे. 

गुंतवणूकगुरु पीटर लिंच यांच्या सूत्रानुसार, दाम दसपट करू शकणाऱ्या कंपनीचा शोध घेताना "बोअरिंग' म्हणजेच उदासीन नाव; तसेच उदासीन वाटणाऱ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचा फंडामेंटल्सनुसार अभ्यास करून संधी शोधणे फायदेशीर ठरू शकते. थोडक्‍यात, गुंतवणुकीची "केमिस्ट्री' कोठे जुळेल, हे पाहायला हवे. 

तेजीचा कल कोठे आहे? 
शॉर्टटर्मच्या आलेखानुसार अशोका बिल्डकॉन, लुपिन, रेल विकास निगम या कंपन्यांचे शेअर तेजीचा कल दाखवत आहेत. रेल विकास निगम या कंपनीच्या शेअरने 21.40 रुपये या महत्त्वाच्या अडथळा पातळीवर शुक्रवारी 22.10 रुपये हा बंद भाव देऊन आलेखानुसार तेजीचे संकेत दिले आहेत. आलेखानुसार, या कंपनीच्या शेअरचा भाव जोपर्यंत 19.50रुपयांच्या वर आहे, तोपर्यंत शॉर्टटर्म म्हणजेच आगामी 1 ते 3 महिन्यांत आणखी वाढ दर्शविणे अपेक्षित आहे. आगामी काळात "निफ्टी'ने; तसेच तेजीचा कल दर्शविणाऱ्या शेअर्सने देखील तेजी दर्शविल्यास, मर्यादित धोका स्वीकारून "स्टॉपलॉस' तंत्राचा वापर करीत शॉर्टटर्मसाठी "ट्रेडिंग' करणे योग्य ठरेल. 

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"विनती ऑर्गेनिक्‍स'चा विचार 
लॉंगटर्मचा विचार करता, केमिकल क्षेत्रातील विनती ऑर्गेनिक्‍स ही कंपनी व्हॅल्युएशननुसार गुंतवणूकयोग्यता दर्शवत आहे. विनती ऑर्गेनिक्‍सच्या शेअरचा सद्यःस्थितीत भाव रु. 996 आहे. कंपनीने मागील पाच वर्षांत टॉपलाईन म्हणजेच विक्री, तसेच बॉटमलाईन म्हणजेच नफ्यात उत्तम वाढ दाखविली आहे. या कंपनीने सरासरी 23 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टेड कॅपिटल' मिळवून बिझनेसमध्ये उत्तम वाढ दर्शविली आहे. कंपनी जवळजवळ कर्जमुक्त आहे. तसेच कंपनीच्या उत्पादनामध्ये उदाहरणार्थ, आयसोब्यूटाइल बेंझीन (ज्याचा वापर औषध क्षेत्रामध्ये होतो) विनती ऑर्गेनिक्‍स ही जगातील सर्वांत मोठी कंपनी आहे. शक्‍यतो रसायननिर्मिती अशा काहीशा उदासीन वाटणाऱ्या क्षेत्राकडे गुंतवणूकदार लक्ष देणे टाळतात. लॉंगटर्मसाठी जोखीम लक्षात घेऊन मर्यादित भांडवल टप्प्याटप्प्याने विनती ऑर्गेनिक्‍स या कंपनीच्या शेअरमधे गुंतविणे फायदेशीर ठरू शकते. 

'वर्क फ्रॉम होम' करत असाल तर जास्तीचा कर देण्याची तयारी ठेवा 

जोखीम ओळखून गुंतवणूक 
एकूण शेअर बाजाराच्या व्हॅल्युएशनचा विचार करता, "निफ्टी' पीईनुसार 31 अंशांवर असल्याने म्हणजेच बाजार अत्यंत महाग असल्याने शॉर्टटर्मचे ट्रेडिंग असो, की लॉंगटर्मची गुंतवणूक असो शेअर बाजारात जोखीम ओळखून मर्यादित भांडवल गुंतविणे; तसेच आधी नमूद केल्यानुसार शॉर्टटर्म ट्रेडिंग करताना "स्टॉपलॉस'चा वापर करणे अत्यंत आवश्‍यक आहे. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बाजाराचे; तसेच शेअर्सचे विश्‍लेषण केले आहे. ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करताना जोखीम ओळखून वैयक्तिक आर्थिक सल्लागाराकडून सल्ला घेऊन व्यवहार करणे योग्य ठरेल. 

(लेखक "सेबी' रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.) 

loading image
go to top