शेअर मार्केट : मेटल सेक्टरला तेजीची झळाळी!

गेल्या आठवड्यात स्टील क्षेत्रातील दिग्गज टाटा स्टील या कंपनीने तिमाही निकालानुसार उत्तम कामगिरी नोंदविल्यानंतर या कंपनीच्या शेअरने जोरदार तेजी दर्शविली आहे.
Share Market
Share MarketSakal

कंपन्यांचे उत्तम तिमाही निकाल; तसेच आंतराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे गेल्या आठवड्यात शुक्रवारी २५६ अंशांच्या तेजीसह ‘सेन्सेक्स’ ४९,२०६ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १४,८२३ अंशांवर बंद झाला. या आठवड्यात एशियन पेंट्स, पिडिलाइट इंडस्ट्रीज, ल्युपिन, लार्सन अँड टुब्रो, डॉ. रेड्डीज लॅब, सिप्ला आदी अनेक नामवंत कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होतील. (Bhushan Godbole Writes about Fast the Metal Sector)

‘हिंदुस्थान कॉपर’कडे लक्ष

गेल्या आठवड्यात स्टील क्षेत्रातील दिग्गज टाटा स्टील या कंपनीने तिमाही निकालानुसार उत्तम कामगिरी नोंदविल्यानंतर या कंपनीच्या शेअरने जोरदार तेजी दर्शविली आहे. गेल्या आठवड्यात स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया (सेल), नॅशनल ॲल्युमिनियम, कल्याणी स्टील आदी अनेक कंपन्यांच्या शेअरनी उत्तम भाववाढ नोंदविली. एकंदरीत मेटल सेक्टरमध्ये सध्या तेजीचा बोलबाला सुरू आहे.

या क्षेत्रातील हिंदुस्थान कॉपर, टिनप्लेट या कंपन्यांचे शेअर आलेखानुसार तेजीचा कल दर्शवत आहेत. हिंदुस्थान कॉपर या कंपनीच्या शेअरने दोन मार्च २०२१ पासून तीन महिने रु. १६५ ते ११४ या मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार केल्यावर गेल्या आठवड्यात रु. १६५ या पातळीच्या वर रु. १७१ ला बंद भाव देऊन आलेखानुसार मध्यम अवधीसाठी तेजीचे संकेत दिले आहेत. यामुळे जोपर्यंत या कंपनीच्या शेअरचा भाव रु. ११३ या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीमध्ये चढ-उतार करीत आणखी भाववाढ होणे अपेक्षित आहे. मात्र, ‘ट्रेडिंग’ करताना या क्षेत्रातील शेअरमधील चंचलता लक्षात घेऊन मर्यादितच धोका स्वीकरून ‘स्टॉपलॉस’ तंत्राचा वापर करणे हितावह ठरू शकेल.

‘ग्लेनमार्क फार्मा’मध्ये तेजीचा कल

फार्मा सेक्टरमधील ग्लेनमार्क फार्मा या कंपनीच्या शेअरने २० एप्रिल २०२१ पासून ६ मे पर्यंत रु. ५९० ते ५४३ या मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार केल्यावर गेल्या आठवड्यात रु. ५९० या पातळीच्या वर रु. ५९१ ला बंद भाव देत अल्पावधीच्या आलेखानुसार तेजीचे संकेत दिले आहेत. २० एप्रिलनंतर शेअरमधील उलाढालीचा विचार करता, गेल्या आठवड्यात शुक्रवारी या कंपनीच्या शेअरमधील उलाढालदेखील वाढली आहे. यामुळे जोपर्यंत या कंपनीच्या शेअरचा भाव रु. ५४२ या पातळीचा वर आहे, तोपर्यंत आगामी काळात चढ-उतार करीत आणखी तेजी दिसू शकते.

अशा प्रकारे आलेखानुसार संधी ओळखून तेजीचा कल दर्शविणाऱ्या शेअरने आगामी काळात देखील तेजीचे संकेत दिल्यास, मर्यादित धोका स्वीकारून ‘ट्रेडिंग’ किंवा व्यवहार करणे योग्य ठरू शकेल.

लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. यामुळे व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे नेहमीप्रमाणेच आवश्यक आहे.

(लेखक ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com