स्मार्ट गुंतवणूक : हाउसिंग फंडात गुंतवणूक का करावी?

प्रत्येक गुंतवणूक प्रवासात एक अशी वेळ येते, जेव्हा आपण एखादी दुर्मीळ गुंतवणूक संधी शोधत असतो.
Housing Fund
Housing FundSakal
Summary

प्रत्येक गुंतवणूक प्रवासात एक अशी वेळ येते, जेव्हा आपण एखादी दुर्मीळ गुंतवणूक संधी शोधत असतो.

- भूषण वाणी

प्रत्येक गुंतवणूक प्रवासात एक अशी वेळ येते, जेव्हा आपण एखादी दुर्मीळ गुंतवणूक संधी शोधत असतो. जरी तुम्ही सर्व मालमत्ता प्रकारांत, जसे की इक्विटी, डेट, सोने आणि स्थावर मालमत्ता श्रेणीत गुंतवणूक केली असली तरीही आपण वेगळ्या संधीच्या शोधात असतो. आता तुम्ही अशा ठिकाणी आहात का, जिथे तुम्ही म्युच्युअल फंडाला पर्यायी गुंतवणूक संधी शोधत आहात? तसे असेल, तर तुम्ही ‘मास्लो’चा पदानुक्रमानुसार गरजांचा सिद्धांत पाहायला हवा.

ही संकल्पना अब्राहम मास्लो यांनी प्रत्यक्षात सादर केली. मास्लोने माणसाच्या वैयक्तिक गरजांचा पदानुक्रम काय असतो, हे सिद्धांतामधून मांडले. ज्यात स्वतःच्या वैयक्तिक गरजा, स्वाभिमान, प्रेम आणि इतर, स्वसंरक्षणाच्या गरजा आणि शेवटची; पण मानसिकदृष्ट्या महत्त्वाची म्हणजे निवाऱ्याची गरज. यामुळे आपल्यातील बहुतांश लोक स्वतःचे घर असावे, या हेतूने खरेदीचा विचार करतात. सुरक्षा आणि संरक्षण यातून निर्माण झालेल्या विचारापासून ते वारशापर्यंत अनेक विचारांचे घर मनात तयार होते. लोकांना स्वतःचे घर असावे, यासाठी थेट खरेदी करण्याऐवजी हाउसिंग फंडात गुंतवणूक करण्याचा पर्याय कितपत योग्य वाटेल?

कित्येक दशके भारत हा देश कृषीप्रधान आणि वस्त्रोद्योगात आघाडीवर राहिला आहे. मात्र, जगण्याच्या मूलभूत गरजांपैकी एक असलेल्या हाउसिंग क्षेत्रात मात्र तो पिछाडीवर आहे. या क्षेत्रात विकासाच्या प्रचंड संधी आहेत. संशोधनातून असे दिसून आले आहे, की भारतातील स्थावर मालमत्ता क्षेत्र २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलरपर्यंत पोचणार आहे. पुढील तीन वर्षांत ‘जीडीपी’मध्ये या क्षेत्राचा १३ टक्के वाटा असेल. कोरोना संकटकाळात लोक पुन्हा घरी परतले. अभ्यासातून असे निदर्शनात आले आहे, की शहरी भागात राहणाऱ्या भारतीयांची संख्या २०२५ पर्यंत ५२५ दशलक्ष इतकी वाढणार आहे. २०३६ मध्ये ती ६०० दशलक्ष इतकी वाढेल. प्रमुख महानगरात घरांची विक्री प्रचंड वाढेल. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे स्थावर मालमत्ता क्षेत्रात प्रचंड वाढ होईल, असा अंदाज आहे.

आताच गुंतवणूक करावी?

प्रत्येक उद्योगाप्रमाणे गृहनिर्माण क्षेत्रदेखील तेजी आणि मंदीच्या चक्रातून गेले आहे. मात्र, संशोधनातून असे दिसून आले आहे, की नजीकच्या काळात या क्षेत्रात वृद्धीचे व्यापक चक्र येईल. त्यामागे पुढील कारणे असतील -

१) लोकसंख्या वाढ

२) लोकसंख्येची घनता

३) वेगाने वाढणारे शहरीकरण

४) मालमत्ता वाढ, परवडणारी घरे आणि वाजवी किंमत आणि

५) सुलभ कर्जे

कोठे गुंतवणूक करावी?

या क्षेत्रातील संभाव्य विकासाच्या संधी पाहता गृहनिर्माण श्रेणीत नुकताच आयसीआसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंडाने ‘हाउसिंग आॅपॉर्च्युनिटीज फंड’ दाखल केला आहे, जो एक चांगला पर्याय ठरू शकतो.

(लेखक सीएफपी आणि क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्यूटर्स प्रा. लि.चे संचालक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com