नवीन वर्षात ‘या’ नियमांमध्ये होणार मोठे बदल; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम?

1 जानेवारी 2023 पासून जे आर्थिक नियम बदलणार आहेत.
money
moneysakal

नवीन वर्षासह तुमच्या बँक आणि वित्ताशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. 1 जानेवारी 2023 पासून जे आर्थिक नियम बदलणार आहेत.

त्यामध्ये क्रेडिट कार्ड, बँक लॉकर, GST ई-इनव्हॉइसिंग, CNG-PNG किंमत आणि वाहनांच्या किंमत वाढण्यासारखे नियमांचा समवेश आहे. नवीन वर्षात असे कोणते बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.

1. बँक लॉकरचे नवीन नियम

रिझर्व्ह बँकेने जारी केलेले नवीन लॉकर नियम 1 जानेवारी 2023 पासून लागू होतील. नियम लागू झाल्यानंतर बँकांना लॉकरबाबत ग्राहकांशी मनमानी करता येणार नाही. लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूचे खूप नुकसान झाले तर त्याची जबाबदारी आता बँकेची असणार आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

याशिवाय आता ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत बँकेसोबत करार करावा लागेल. याद्वारे ग्राहकांना लॉकरच्या नियमांमध्ये झालेल्या बदलाची माहिती एसएमएस आणि इतर माध्यमातून बँकेला द्यावी लागेल.

2. क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल

तुम्हीही क्रेडिट कार्डधारक असाल तर आता क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. एचडीएफसी बँक आपल्या क्रेडिट कार्डच्या पेमेंटवर मिळालेल्या रिवॉर्ड पॉइंट्सचे नियम बदलणार आहे. यामध्ये तुमचे सर्व रिवॉर्ड पॉइंट 31 डिसेंबर 2022 पूर्वी भरा.

3. जीएसटी ई-इनव्हॉइसिंगच्या नियमांमध्ये बदल

नवीन वर्षापासून जीएसटी ई-इनव्हॉइसिंग किंवा इलेक्ट्रॉनिक बिलच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. सरकारने आता 2023 पासून जीएसटीच्या ई-इनव्हॉइसिंगसाठी 20 कोटींची मर्यादा कमी करून 5 कोटी केली आहे.

हा नवा नियम 1 जानेवारी 2023 पासून लागू होत आहे. अशा परिस्थितीत ज्या व्यापाऱ्यांचा व्यवसाय 5 कोटींहून अधिक आहे त्यांना इलेक्ट्रॉनिक बिले काढणे आता आवश्यक आहे.

4. एलपीजी किंमत बदल

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारकडून एलपीजीबाबत एक चांगली बातमी जाहीर केली जाऊ शकते. नवीन वर्षात सरकारी तेल कंपन्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती कमी करण्याची घोषणा करू शकतात, असे मानले जात आहे.

money
Share Market : कोरोनामुळे शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' 3 शेअर स्वस्तात खरेदी करण्याची मोठी संधी

गेल्या काही काळात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. अशा परिस्थितीत सरकारी तेल कंपन्यांच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करून सरकार ग्राहकांना दिलासा देऊ शकते.

5. कार खरेदी करणे होणार महाग :

तुम्ही 2023 मध्ये नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर एमजी मोटर, मारुती सुझुकी, ह्युंदाई मोटर, टाटा मोटर्स, मर्सिडीज-बेंझ, ऑडी आणि रेनॉल्ट या कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

टाटा मोटर्सने 2 जानेवारी 2023 रोजी आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किंमती वाढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी होंडा कार्सनेही वाहनांच्या किंमतीत 30,000 रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com