शेअर बाजारात ‘स्मॉल कॅप’ ठरले सर्वाधिक हिट!

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जून 2017

मुंबई: मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसईच्या 'स्मॉल कॅप' निर्देशांकाने सरलेल्या तीन वर्षात 72.11 टक्के परतावा दिला आहे. शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सहून अधिक परतावा सरलेल्या तीन वर्षांमध्ये 'स्मॉल कॅप' निर्देशांकाने दिला आहे.

स्मॉल कॅप' निर्देशांकाच्या तुलनेत सेन्सेक्स आणि लार्ज कॅप निर्देशांकांनी अनुक्रमे 34.24 टक्के आणि 38.56 टक्के परतावा दिला आहे. त्याचप्रमाणे बीएसई स्मॉल कॅप सिलेक्ट निर्देशांकाने 66.86 टक्के परतावा दिला आहे. स्मॉल कॅप सिलेक्ट निर्देशांकात शेअर बाजारात नियमीत खरेदी-विक्री होणार्‍या 60 कंपन्यांचा समावेश आहे. स्मॉल कॅप सिलेक्ट निर्देशांकाने देखील सेन्सेक्सपेक्षा जास्त परतावा दिला आहे, अशी माहिती ‘एस अँड पी बीएसई इंडिसेस’चे कार्यकारी संचालक वेद मल्ला यांनी दिली. त्याचप्रमाणे सरलेल्या वर्षात लार्ज कॅप निर्देशांकाने 'स्मॉल कॅप' निर्देशांकाच्या तुलनेत कमी परतावा दिला आहे.

Web Title: The biggest hit on the stock market was 'Small Cap'!