बिटकॉईनचा उच्चांक; किमतीने ओलांडला पन्नास हजार डॉलरचा टप्पा

वृत्तसंस्था
Wednesday, 17 February 2021

जगभरातील आघाडीचे टेक्नोक्रॅट आणि उद्योजकांना भुरळ घालणाऱ्या बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सनीने मंगळवारी ऐतिहासिक भरारी घेतली. आज पहिल्यांदाच एका बिटकॉईनची किंमत ही पन्नास हजार डॉलरच्याही पुढे गेली होती. मागील बारा वर्षांतील ही उच्चांकी वाढ आहे.

न्यूयॉर्क - जगभरातील आघाडीचे टेक्नोक्रॅट आणि उद्योजकांना भुरळ घालणाऱ्या बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सनीने मंगळवारी ऐतिहासिक भरारी घेतली. आज पहिल्यांदाच एका बिटकॉईनची किंमत ही पन्नास हजार डॉलरच्याही पुढे गेली होती. मागील बारा वर्षांतील ही उच्चांकी वाढ आहे. आज जगभरातील क्रिप्टो एक्सचेंजमध्ये बिटकॉईनची किंमत ५० हजार ५८४.८५ डॉलरवर पोचली होती. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत ३६.८३ लाख एवढी भरते. आज दिवसभर बिटकॉईनच्या भावामध्ये मोठा चढउतार पाहायला मिळाला, सायंकाळपर्यंत त्यात किंचितशी घट झाली. क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज कॉईनडेकवर एका बिटकॉईनची किंमत ही ४९ हजार ४४२ एवढी होती. दरम्यान चालू वर्षामध्ये बिटकॉईनच्या किमतींमध्ये ७३ टक्क्यांची वाढ झाली आहे. इथेरियम या क्रिप्टोकरन्सीमध्ये तब्बल दीडशे टक्क्यांची वाढ झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यामुळे वाढ

  • जगभरात बिटकॉईनची वाढलेली स्वीकारार्हता 
  • उद्योगपती, श्रीमंतांकडून वाढती गुंतवणूक
  • ॲपल, टेस्लासारख्या बड्या कंपन्यांची गुंतवणूक
  • एलॉन मस्क १.५ अब्ज डॉलर गुंतविणार
  • जगातील बड्या विमा कंपन्यांचे लक्ष्य बिटकॉईनवर

Good News: आयटी सेक्टरमध्ये तब्बल 44 लाख रोजगाराची संधी, 95 टक्के सीईओंचे मत

भविष्यातील शक्यता
गुंतवणूक क्षेत्रातील आघाडीची फर्म जेपी मॉर्गनने भविष्यामध्ये एका बिटकॉईनची किंमत १ लाख ४६ हजार डॉलरपर्यंत जाऊ शकते अशी शक्यता वर्तविली आहे. मास्टरकार्डने त्यांच्या नेटवर्कवर क्रिप्टोकरन्सी पेमेंट स्वीकारण्याची तयारी चालविली आहे. मॉर्गन स्टॅनली ही कंपनी देखील बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणार आहे. दरम्यान बिटकॉईनच्या भावातील वाढ हा डिजिटल बबल असून तो लवकरच फुटेल असेही काही जाणकारांचे म्हणणे आहे. जगातील पहिले बिटकॉईन ईटीएफ लवकरच कॅनडामध्ये लाँच होणार आहे. यासाठीच्या कायदेशीर प्रक्रियेला देखील सुरुवात झाली आहे. यामुळे देशातील किरकोळ गुंतवणूकदार यामध्ये गुंतवणूक करू शकतील.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bitcoin peaks price crossed the fifty thousand dollar mark