Budget 2019 : गोमातेसाठी मोदी सरकारची नवी योजना; आवर्जून वाचा!

Friday, 1 February 2019

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : गेल्या साडेचार वर्षांमध्ये गोरक्षणाच्या मुद्यावरून भाजप आणि विरोधकांमध्ये सतत संघर्ष होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर होत असलेल्या हंगामी अर्थसंकल्पामध्ये पीयुष गोयल यांनी पुन्हा एकदा गोरक्षणाच्या उच्चार केला.

'गोमातेच्या सेवेसाठी भाजप सरकार कधीच मागे राहणार नाही', अशी घोषणा गोयल यांनी केली. या घोषणेसह मोदी सरकारने राष्ट्रीय कामधेनू योजनाही जाहीर केली.

ठळक मुद्दे 

 • गोमातेच्या सेवेसाठी हे सरकार कधीच मागे पाहणार नाही
 • गायीसाठी राष्ट्रीय कामधेनू योजना सुरु करणार
 • गायींच्या प्रजाती सुधारण्यासाठी ही योजना असेल
 • पशुपालन आणि मत्स्यपालनासाठी विशेष योजना राबविण्यात येणार
 • पशुसंवर्धनासाठी किसान क्रेडिट योजना सुरु करणार
 • पशुसंवर्धन आणि मत्स्यपालनाच्या घेण्यात आलेल्या कर्जात 2 टक्के सूट
 • मनरेगासाठी मोठ्या प्रमाणात वित्त सहाय्य करण्यात आले
 • प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी खर्च केले
 • प्रधानमंत्री आवास योजनेतून 1 कोटी 53 लाख घरांची निर्मिती करण्यात आली
 • सौभाग्य योजनेमुळे आम्ही प्रत्येक घरात वीजेचे कनेक्शन दिले आहे
 • आम्ही 143 कोटी एलईडी बल्ब उपलब्ध करून दिले
 • 2021 पर्यंत प्रत्येक घरात वीज पोचविण्यात येईल
 • गरिब कुटुंबांचे 50 हजार कोटी यामुळे वाचणार आहेत
 • स्वस्त धान्यासाठी 1 लाख 70 कोटी रुपयांची तरतूद
 • आयुषमान भारत योजनेचा आतापर्यंत 10 लाख नागरिकांवर उपचार करण्यात आला आहे
 • शेतकऱ्यांना एमएसपीनुसार मुल्य देण्यात येत आहे
 • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सरकारने लागू केली आहे
 • दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्यांना शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वर्षाला देण्यात येणार

मोदी सरकारचा धमाका

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP government announces new scheme for cows in Budget 2019