शेअर बाजारात 'ब्लॅक फ्रायडे'

शेअर बाजारात 'ब्लॅक फ्रायडे'

मुंबई: शेअर बाजारात आजचा 'ब्लॅक फ्रायडे' ठरला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 792.17 अंशांनी कोसळून  34 हजार 376.99 अंशांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये  282.80 अंशाची घसरण झाली. निफ्टी अखेर 10 हजार 316.45 पातळीवर स्थिरावला. बँका आणि आयातदारांनी डॉलरची मोठी मागणी केल्याने एका डॉलरच्या तुलनेत रूपयाचे मूल्य घसरून ७४ रुपयांवर पोचले. अखेरच्या अर्ध्या तासात शेअर बाजार ९५० अंशांनी कोसळला होता. मात्र काही मिनिटांमध्ये सेन्सेक्स १५० अंशांनी सावरला. 

पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये कपात करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतल्यानंतर उर्जा क्षेत्रातल्या कंपन्यांचे शेअरमध्ये जोरदार घसरण झाली. दोन दिवसांमध्ये या क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअरचे बाजारभांडवल सव्वा लाख कोटी रुपयांनी घसरले आहे. केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी करतानाच तेल कंपन्यांनी प्रति लिटर एक रुपया इतका भार सोसावा असे सांगितले आहे. तसेच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यांचा समावेश असलेल्या पतधोरण समितीने आज (शुक्रवार) रेपो दर 'जैसे थे'च ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट 6.50 टक्‍क्‍यांवर कायम ठेवला आहे. तसेच, रिव्हर्स रेपो 6.25 टक्क्यांवर कायम आहे. कच्च्या तेलातील दरवाढ, वाढती महागाई यांचा प्रभाव कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक व्याजदरात पाव टक्का वाढ करण्याची शक्यता उद्योग आणि बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविली होती. त्याने देखील गुंतवणूकदारांची निराशा केली. 

आज मुंबई शेअर बाजारात हिंदपेट्रो, बीपीसीएल, आयओसी, ओएनजीसी आणि गेल या उर्जा क्षेत्रातल्या कंपन्यांचे शेअर सर्वाधिक घसरले तर टीसीएस
टायटन, इन्फोसिस, इंफ्राटेल यांच्या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com