BMC Budget 2023 : आज मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्प होणार सादर; कुठे पाहू शकता, जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BMC Budget 2023

BMC Budget 2023 : आज मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्प होणार सादर; कुठे पाहू शकता, जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

मुंबई महानगरपालिकेचा 2023-24 साठीचा अर्थसंकल्प आज ४ फेब्रुवारीला मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक आणि महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात मांडण्यात येणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर यंदा पालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

उत्पन्न वाढीचे नवे मार्ग शोधले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, आणि इतर सेवांसाठी अतिरीक्त कर लावला जाण्याची शक्यता आहे. भूमिगत टाक्या, अद्ययावत शिक्षण, कोस्टल रोड यांचा या अर्थसंकल्पात समावेश असेल.

तसेच कोस्टल रोड, मिठी नदी पर्यटन आणि पालिका शाळांमध्ये सीबीएसई-आयसीएसई बोर्डाच्या माध्यमातून अद्ययावत शिक्षणावर भर दिला जाण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा : रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

सकाळी १०.३० वाजता अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे या शिक्षण खात्याचा अर्थसंकल्प डॉ इक्बाल सिंह चहल यांना सादर करतील. तर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल अर्थसंकल्प सादर करतील.

देशातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या इतिहासात 38 वर्षांत प्रथमच प्रशासक अंदाजपत्रक मांडणार आहेत.

इथे पहा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प :

थेट प्रक्षेपणः Live

४ फेब्रुवारी २०२३, सकाळी १०.३० वाजता

• यूट्यूब लिंक/YouTube Link

https://youtube.com/live/cAdieugHZbk?feature=share

• फेसबूक लिंक/Facebook Link

https://www.facebook.com/events/703377594798612/

टॅग्स :electionBMCBudget