चंदा कोचर यांना न्यायालयाकडून दिलासा नाहीच; याचिका फेटाळली

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 March 2020

- चंदा कोचर यांनी बॅंकेतील आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बॅंकेने त्यांना सेवेतून काढून टाकले होते.

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने चंदा कोचर यांची आयसीआयसीआय बॅंकेविरोधातील याचिका फेटाळली आहे. चंदा कोचर या आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बॅंकेने त्यांना पदावरून काढून टाकले होते. यासंदर्भात चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बॅंकेविरोधात खटला दाखल केला होता. न्यायमूर्ती एम एम जामदार आणि न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या बेंचने बॅंकेचा युक्तिवाद स्वीकारताना कोचर यांची याचिका अयोग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. बॅंकेकडून याआधी या प्रकरणात राज्यघटनेच्या कलम 226 अंतर्गत न्यायालयीन पुनरावलोकन केले जाऊ शकत नसल्याचा युक्तिवाद केला होता. कोचर यांची याचिका फेटाळण्यात यावी, अशी मागणी आयसीआयसीआय बॅंकेने न्यायालयात केली होती.

चंदा कोचर यांनी बॅंकेतील आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बॅंकेने त्यांना सेवेतून काढून टाकले होते. परंतु बॅंकेचे हे पाऊल चूकीचे असल्याचा आरोप करत कोचर यांनी न्यायालयात धाव घेतली होती. बॅंकेने आपल्याला मिळणारे भत्ते आणि इतर लाभ देण्यास नकार दिल्याचेही चंदा कोचर यांचे म्हणणे आहे.

Coronavirus : इराणमधील भारतीय म्हणतात, 'आम्हाला वाचवा ओ'

एप्रिल 2009 आणि मार्च 2018 या दरम्यानचे विविध बोनस आणि शेअरचा पर्याय यांचा लाभ बॅंकेने आपल्याला देण्यास नकार दिला आहे. चंदा कोचर यांच्यावर व्हिडिओकॉन समूहाला बॅंकेचे नियम डावलून 3,250 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचा आणि त्याबदल्यात स्वत:ला आणि पतीला लाभ मिळवून घेतल्याचा आरोप आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bombay High Court Court Dismisses Chanda Kochhar Challenge To Sacking As a ICICI Bank CEO