गॅस सिलिंडर बुक करताय? तर मग नक्की हे वाचा

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 16 November 2020

जर ग्राहकांनी गॅस सिलेंडरचे पेमेंट ऑनलाईन केले तर त्यांना यावर डिस्काउंट ऑफरही मिळतात

नवी दिल्ली: प्रत्येक महिन्याला केंद्र सरकार घरगुती गॅसच्या किंमती जाहीर करत असते. यामुळेच प्रत्येक महिन्यात गॅसचे नवीन दर जाहीर होत असतात, यामुळे दर महिन्याला अनुदानातही बदल होत असतो. ग्राहकांनी गॅस सिलिंडर बूक करून तो डिलिव्ह झाल्यानंतर काही दिवसांनी खात्यात अनुदानाची रक्कम जमा होत असते. उदारणार्थ आठशे रुपयांच्या सिलिंडरला 200 रुपये अनुदान तुमच्या आधारकार्डाला जोडलेल्या बँक खात्यात जमा होत असतात. 

ज्यांच्याकडे अनुदान नसलेले सिलिंडर आहे ते लोक या अनुदानापासून वंचित राहतात. पण अजूनही काही लोकांना गॅस सिलिंडरवर सूट दिली जाते ही गोष्ट माहित नाही. विनाअनुदानात गॅस ग्राहकांना फायदा व्हावा म्हणून ही सवलत विना अनुदानित सिलिंडरवरही उपलब्ध आहे.

Boycott China: भारताशी नडल्याने चीनला 40 हजार कोटींचा तोटा

ऑनलाईन पेमेंटवर सवलत-
जर ग्राहकांनी गॅस सिलिंडरचे पेमेंट ऑनलाईन केले तर त्यांना यावर डिस्काउंट ऑफरही मिळतात. केंद्राच्या डिजिटल पेमेंट मोहिमेला प्रात्साहन देण्यासाठी गॅस एजन्सीज वेगवेगळ्या ऑफर देत असतात. यात ग्राहकांना कूपन, कॅशबॅक, इन्स्टंट डिस्काउंट, कूपन रीडीम सारख्या सुविधा दिल्या जातात. ही ऑनलाईन पेमेंटमधील सवलत अनुदानित आणि विनाअनुदानित सिलिंडर अशा दोन्ही प्रकारांवर उपलब्ध आहे.

Diwali 2020: ज्वेलरी शॉपशिवाय सोने खरेदीच्या इतर तीन पद्धती ठरतील फायद्याच्या

गॅसचे ऑनलाईन पेमेंट करताना तुम्ही बऱ्याच नामवंत कंपन्यांचे ऍपवरून ऑनलाईन पेमेंट करू शकता. यामुळे असणाऱ्या सवलतीचा मोठा लाभ मिळू शकतो. पेटीएम, फोन पे, यूपीआय, भीम अ‍ॅप, गूगल पे, मोबिक्विक, फ्री-चार्ज हे लोकप्रिय डिजिटल पेमेंट ऍप यासाठी जास्तकरून उपयोग केले जातात.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: before Booking gas cylinder should read this