Boycott China: भारताशी नडल्याने चीनला 40 हजार कोटींचा तोटा

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 16 November 2020

2020 ची दिवाळी भारतीय बाजारपेठेसाठी काही प्रमाणात वेगळी ठरली आहे.

नवी दिल्ली: 2020 ची दिवाळी भारतीय बाजारपेठेसाठी काही प्रमाणात वेगळी ठरली आहे. कारण एका बाजूला कोरोनामुळे लोकांची खरेदीशक्ती कमी तर दुसऱ्या बाजूला चीनसोबतच्या सीमावादामुळे भारतीय बाजारपेठेत चिनी वस्तूंवरील बंदी. अशातही भारतीय बाजारपेठेसंबधीची कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने दिलेली माहिती दिलासादायक आहे. 

चीनला 40 हजार कोटींचा तोटा-
या दिवाळीत आतापर्यंत बाजारपेठेत 72 हजार कोटींपेक्षा जास्त उलाढाल झाल्याची माहिती CAITने दिली आहे. या दिवाळीत चिनी मालावर पूर्णपणे बंदी होती. तरीही बाजारातील उलाढाल अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरत आहे. तज्ज्ञांच्या मते, चिनी मालावर बंदी (boycott china) असल्याने चिनी व्यापाऱ्यांना 40 हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा तोटा झाल्याचं सांगितलं आहे.

Diwali 2020: ज्वेलरी शॉपशिवाय सोने खरेदीच्या इतर तीन पद्धती ठरतील फायद्याच्या

सीमावाद आणि व्यापार-
 भारत आणि चीन यांच्यातील पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (Line of Actual Control-LAC) तणावानंतर The Confederation of All India Tradersने चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते.

72 हजार कोटींची उलाढाल-
व्यापाराच्या दृष्टीने भारतातील मुख्य 20 शहरांमधून गोळा करण्यात आलेल्या अहवालानुसार, दिवाळीकाळात सुमारे 72 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. तसेच boycott chinaमुळे चीनला 40 हजार कोटी रुपयांचा तोटा होईल अशी अपेक्षा असल्याची माहिती  CAITने अहवालात दिली आहे.

उत्पादन क्षेत्राला दोन लाख कोटींचे बळ; दहा क्षेत्रांसाठीच्या प्रोत्साहन योजनेची केंद्राची घोषणा

FMCG वस्तूंची खरेदी जास्त-
दिवाळीच्या काळात सर्वाधिक खरेदी केलेली उत्पादनांत एफएमसीजीचा (fast-moving consumer goods) समावेश भरपूर आहे.  कन्झ्युमर ड्युरेबल्स, खेळणी, विद्युत उपकरणे आणि वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, स्वयंपाकघरातील वस्तू आणि अॅक्सेसरीज, भेटवस्तू, कन्फेक्शनरी वस्तू, मिठाई या वस्तूंची खरेदी लक्षणीय असल्याचे दिसले आहे.

20 शहरांत केला सर्वे-
दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, नागपूर, रायपूर, भुवनेश्वर, रांची, भोपाळ, लखनौ, कानपूर, नोएडा, जम्मू, अहमदाबाद, सुरत, कोचीन, जयपूर, चंदीगड या शहरांत सीएआयटीतर्फे सर्वे घेण्यात आले आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China suffers huge losses in India Diwali sales crossed 72000 crore