Diwali 2020: ज्वेलरी शॉपशिवाय सोने खरेदीच्या इतर तीन पद्धती ठरतील फायद्याच्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gold coin

दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी शुभ मानली जाते. भारतीयांसाठी सोने हे एक नेहमी आकर्षण ठरले आहे.

Diwali 2020: ज्वेलरी शॉपशिवाय सोने खरेदीच्या इतर तीन पद्धती ठरतील फायद्याच्या

नवी दिल्ली: दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी शुभ मानली जाते. भारतीयांसाठी सोने हे एक नेहमी आकर्षण ठरले आहे. भारतात सोन्याच्या आर्थिक मूल्यासह त्याचे भावनिक आणि सामाजिक मूल्यही वेगळ्या प्रकारचे आहे. दागिने, नाणी बचतीच्या स्वरूपात ठेवण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. तसेच सोन्यातील गुंतवणूकही चांगली समजते जाते. सोने सुरुक्षित कसे आणि कुठे खरेदी करायचे असे अनेक प्रश्न अनेकांना पडले असतील. सोन्याची योग्य गुंतवणूक कशी करावी हे देखील आपण या लेखात पाहणार आहोत.

भौतिक सोने (Physical gold)-
बाजारातील ज्वेलर्स, बँका, ऑनलाइन स्टोअर्स, एनबीएफसी इत्यादींकडून सोन्याची नाणी किंवा बिस्किटे खरेदी करून तुम्ही प्रत्यक्ष सोन्यात गुंतवणूक करू शकता. सोन्याची नाणी साधारणपणे 5 आणि 10 ग्रॅमच्या स्टँडर्ड डिनॉमिनेशनमध्ये असतात. तर बिस्किटे 20 ग्रॅमची असतात, ज्यांची शुध्दता 24 कॅरत असते. बिस्कीचे बीआयएसच्या मानकानुसार हॉलमार्कसोबत येत असतात.

उत्पादन क्षेत्राला दोन लाख कोटींचे बळ; दहा क्षेत्रांसाठीच्या प्रोत्साहन योजनेची केंद्राची घोषणा

सोन्यात गुंतवणूक करण्याची ही पारंपरिक पद्धत आहे. गुंतवणूकदार सहसा वर्षाच्या शुभ दिवसांत सोने खरेदी करतात. याबद्दलची अधिक माहिती तुम्हाला या वेबसाईटवर समजेल- https://www.indiangoldcoin.com/en/index-2/

सार्वभौम गोल्ड बाँड ( sovereign gold bond)-
सरकार वेगवेगळ्या वेळी सार्वभौम गोल्ड बाँड (एसजीबी) जारी करत असते. जेव्हा हे इश्यू केले जाते तेव्हा गुंतवणूकदार एसजीबीचे सदस्यत्व घेऊ शकतात. गुंतवणूकदार 1 ग्रॅमच्या डीनॉमिनेशनमध्ये गुंतवणूक करू शकतात. अलॉटमेंट गोल्ड बाँड सर्टिफिकेट दिले जाते. गुंतवणुकदाराला एसजीबी माघारी घेताना सोन्याचा भाव मिळत असतो. तीन दिवसांच्या सरासरी क्लिअरिंग किंमतीत दर निश्चित करण्यात येतात. बाँड कालावधीत गुंतवणूकदाराला पूर्वनिर्धारित दराने व्याज दिले जाते. SGB चे इश्यू सुरु झाल्यावर गुंतवणूकदार थेट बँकेच्या शाखा, पोस्ट ऑफिस, अधिकृत शेअर बाजार किंवा त्यांच्या एजंटांमार्फत अप्लाय करु शकतात.

कोरोनामुळे भारतात मंदीचे सावट; 8.6 टक्क्यांनी घसरू शकतो GDP

गोल्ड ईटीएफ- 
गोल्ड एक्स्चेंज ट्रेडर्ड फंडांच्या ( Gold Exchange-traded fund) माध्यमातून सोन्यात गुंतवणूक करता येते. सोने ईटीएफचे युनिट्स शेअर बाजारात सूचीबद्ध असतात. ग्राहक हे युनिट्स तिथून विकत घेऊ शकतात. याची किंमत सोन्याच्या किंमतीवरच अवलंबून असते. गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट असणे आवश्यक आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा-
भौतिक सोन्याची नाणी खरेदी करण्यासाठी मेकिंग चार्ज लागतो. अनुभवी गुंतवणूकदार गोल्ड फ्युचर्स आणि पर्यायवापरून कमॉडिटी एक्स्चेंजच्या माध्यमातून सोन्यात गुंतवणूक करू शकतात.

Web Title: Diwali Festival 2020 Three Ways Buy Gold

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top