#अर्थसंकल्प2017 : बँकांच्या सक्षमीकरणावर भर 

टीम ई सकाळ
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

अर्थसंकल्प म्हणजेच बोली भाषेत प्रचलित असलेला 'बजेट'चा हा दिवस सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरतो. दारिद्र्यरेषेखालील गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत आणि चतुर्थश्रेणीतील चाकरमान्यांपासून ते बड्या उद्योजकांपर्यंत सर्वांनाच बजेटमध्ये जाहीर करण्यात येणाऱ्या योजनांचा, निर्णयांचा कमी-अधिक प्रमाणात लाभ होतो किंवा झळ बसत असते. 

आपल्या दृष्टिकोनातून वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनात या बजेटचा काय परिणाम होणार आहे? तुमच्याच शब्दांत थोडक्यात शेअर करा. 

आमच्यापर्यंत आपले मत पोचवा : 

  • प्रतिक्रियांच्या माध्यमातून...
  • सविस्तर विश्लेषण webeditor@esakal.com वर ईमेल करा. Subject मध्ये लिहा : Budget2017
  • सकाळ संवाद मोबाईल अॅपवरून आपले मत, विश्लेषण आमच्यापर्यंत पोचवू शकता. 
  • @eSakalUpdate ला तुमचे मत थोडक्यात ट्विट करा
  • फेसबुकवर कॉमेंट करा : www.facebook.com/SakalNews/

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटलींनी बँकांच्या सक्षमीकरणावर भर दिला आहे. अर्थसंकल्पात जेटलींनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी वर्ष 2017-18 साठी दहा हजार कोटींच्या कोटींची तरतूद जाहीर केली आहे. 

''इंद्रधनुष योजनेनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दहा हजार कोटींचा निधी देण्यात येणार आहे. याशिवाय आवश्यक असल्यास बँकांसाठी अतिरिक्त निधी दिला जाईल,'' असे केंद्रीय अर्थमंत्री जेटली 2017-18 अर्थसंकल्प सादर करताना म्हणाले. बुडित कर्जांच्या वसुलीसाठी यंत्रणेत सुधारणा करण्यात येणार असून दिवाळखोरी जाहीर करण्याच्या नियमांमध्येही बदल करण्याचा इशारा दिला आहे. 

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामात सुधारणा व्हावी यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गेल्या अर्थसंकल्पात सात कलमी 'इंद्रधनुष' योजना जाहीर केली होती. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दरवर्षी रु.25 हजार कोटींचा निधी देण्यात येणार आहे. त्यापैकी आर्थिक वर्ष 2017—18 आणि 2018—19 मध्ये दहा हजार कोटी देण्यात येणार आहे. 

2020पर्यंत बुडीत कर्जे कमी करण्यासाठी या बॅंकांना सरकारी भांडवलावर अवलंबून राहावे लागणार आहे. पुढील चार वर्षात सरकारकडून 70 हजार कोटींचे भांडवले दिले जाणार आहे. मात्र बॅंकांची गरज पाहता सव्वालाख कोटींच्या भांडवलाची आवश्‍यकता आहे. 

केंद्र सरकारने बँकांसाठी निधी मंजूर केल्यामुळे आज मुंबई शेअर बाजारात बँकांचे शेअर्स वधारले आहे. सध्या मुंबई शेअर बाजारात स्टेट बॅंकेचा शेअर 267.25 रुपयांवर व्यवहार करत असून तो 7.25 रुपयांनी म्हणजेच 2.79 टक्क्यांनी वधारला आहे. 
बॅंक ऑफ बडोदाचा शेअर 6.90 रुपयांनी म्हणजेच 4 टक्क्यांनी वधारला आहे. सध्या बॅंकेचा शेअर 172 रुपयांवर व्यवहार करतो आहे. पीएनबीचा शेअर 139.80 रुपयांवर व्यवहार करत असून तो 3.85 रुपयांनी म्हणजेच 2.83 टक्क्यांनी वधारला आहे.

Web Title: Budget 2017 Arun Jaitley Indian Economy Banking system Modi Cabinet Demonetization