'इन्कम टॅक्‍स'मध्ये सूट दिली असती, तर बरं झालं असतं.. : बाबा रामदेव

गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : "अर्थसंकल्पामध्ये प्राप्तिकरात पाच लाख रुपयांपर्यंत सूट देण्याचा निर्णय झाला असता, तर जनतेला दिलासा मिळाला असता. पण यासंदर्भातील निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी आशा आहे' अशी प्रतिक्रिया बाबा रामदेव यांनी आज (गुरुवार) व्यक्त केली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे स्वागत करताना विविध क्षेत्रातील नामवंतांनी काही बाबतींमध्ये नाराजीही व्यक्त केली आहे. 

नवी दिल्ली : "अर्थसंकल्पामध्ये प्राप्तिकरात पाच लाख रुपयांपर्यंत सूट देण्याचा निर्णय झाला असता, तर जनतेला दिलासा मिळाला असता. पण यासंदर्भातील निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी आशा आहे' अशी प्रतिक्रिया बाबा रामदेव यांनी आज (गुरुवार) व्यक्त केली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे स्वागत करताना विविध क्षेत्रातील नामवंतांनी काही बाबतींमध्ये नाराजीही व्यक्त केली आहे. 

'हा अर्थसंकल्प देशाची बांधणी करणारा आहे' अशा शब्दांत बाबा रामदेव यांनी जेटली यांच्या अर्थसंकल्पाचे कौतुक केले. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा मोदी सरकारचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. पुढील वर्षी एप्रिल-मेमध्ये निवडणूक होण्याची शक्‍यता असल्याने यंदाचा अर्थसंकल्पच त्या अर्थाने महत्त्वाचा होता. 

यात नवीन काय होते? 
'या अर्थसंकल्पात काहीही नवीन नव्हते. जनतेसाठी यात काहीही चांगले नाही. बेरोजगारीविषयी अर्थमंत्र्यांनी चकार शब्द उच्चारला नाही. मध्यम आणि लघु उद्योजकांनाही फटका बसत आहे', अशी टीका पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. 

आंध्र प्रदेशसाठी काहीच नाही! 
'अर्थमंत्र्यांनी आंध्र प्रदेशसाठी काहीच घोषणा केली नाही. तेलंगणा, तमिळनाडूसारख्या राज्यांचे अर्थसंकल्प मोठे असतात; पण आंध्र प्रदेशमध्ये तुटीचाच अर्थसंकल्प आहे. आम्ही या अर्थसंकल्पामुळे खूप निराश झालो आहोत' अशी प्रतिक्रिया तेलगू देसम पक्षाचे खासदार आर. एम. नायडू यांनी व्यक्त केली. 

उद्योजक काय म्हणतायत..? 
या अर्थसंकल्पातील काही मुद्दे चांगले आहेत. पण कॉर्पोरेट टॅक्‍स कमी न झाल्याने मी खरंच निराश झालो. मात्र, ग्रामीण भागासाठी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा उपयुक्त आहेत. 
- अदी गोदरेज, गोदरेज समूहाचे अध्यक्ष 

आरोग्य सेवेसंदर्भातील घोषणा ही अर्थसंकल्पातील सर्वांत जमेची बाजू आहे. पण या योजनेचे तपशील अधिक महत्त्वाचे आहेत. या योजनेसाठीचा निधी कसा उपलब्ध करून देणार, हा कळीचा मुद्दा असेल. जिल्हा रुग्णालयांचे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रुपांतर करण्याचा प्रस्ताव चांगला वाटत आहे. 
- किरण मजुमदार शॉ, बायकॉनच्या अध्यक्ष 

ज्येष्ठ नागरिकांच्या मुद्यांकडे लक्ष देण्यात आल्याचे पाहून समाधान वाटले. 'सर्वांत तरुण देश' असतानाच आपण 'सर्वांत वृद्ध' लोकसंख्या असलेला देश याकडेही वाटचाल करत आहोत, हे विसरता कामा नये. योजना चांगल्या असल्या, तरीही अंमलबजावणी अधिक महत्त्वाची आहे. 
- सुनील मुंजाळ, हिरो एंटरप्राईजचे अध्यक्ष 

Web Title: Budget 2018 Union Budget Arun Jaitley Income Tax slab changes Baba Ramdev