Budget 2019: अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे...

शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019

नवी दिल्लीः केंद्रातील विद्यमान नरेंद्र मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प आज (शुक्रवार) पीयूष गोयल यांनी सादर केला. अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे-

नवी दिल्लीः केंद्रातील विद्यमान नरेंद्र मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प आज (शुक्रवार) पीयूष गोयल यांनी सादर केला. अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे-

 • 5 लाखांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री
 • आयकरात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, करमर्यादा अडीच लाखांवरून पाच लाखांवर
 • 60 वर्षानंतर मजुरांना 3 हजार पेन्शन
 • देशात क्लीन एनर्जीचा वापर वाढविण्यावर भर देणार
 • रस्ते, रेल्वे, हवाईसेवा सुधारण्यावर भर  
 • 1 करोडपेक्षा अधिक जणांनी नोटबंदीनंतर इन्कम टॅक्स भरला
 • करदात्यांच्या संख्येत वाढ, यंदा 12 लाख कोटी करस्वरूपात मिळाले
 • आयकरात मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे  
 • मनोरंजन क्षेत्रासाठी सर्वच परवानग्या एकाच खिडकीवर
 • संरक्षण खात्यासाठी आजवरचा सर्वात मोठा निधी दिल्याचा दावा. 3 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकची तरतूद करणार  
 • ऑनलाईन व्यवहाराने सर्व चित्र बदलले, जन-धन योजनेचा मोठा वाटा
 • ईशान्य भारताला मुख्य प्रवाहात आणले, मिझोरम त्रिपुरा रेल्वेच्या कक्षेत  
 • येत्या 5 वर्षात 1 लाख डिजिटल गावांची निर्मिती
 • भारतात जगातील सर्वाधिक मोबाईल वापरकर्ते, सर्वात स्वस्त इंटरनेट सेवा  
 • 5 वर्षात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली, 100 हुन अधिक विमानतळ कार्यरत
 • रेल्वे खात्यासाठी 64 हजार 500 कोटींची तरतूद, वंदे भारत हायस्पीड ट्रेन पहिल्यांदाच भारतात
 • दररोज देशात 27 किलोमीटरच्या रस्त्यांची निर्मिती  
 • जोखीम असलेल्या पदांसाठी भत्त्यात वाढ, वन रँक, वन पेन्शन योजना लागू  
 • संरक्षणासाठी 3 लाख कोटींहून अधिक कर्ज
 • गर्भवती महिलांसाठी 26 आठवड्यांच्या पगारी रजेची तरतूद
 • मुद्रा योजनेत 15 कोटींचे कर्जवाटप, मुद्रा योजनेचा 70 टक्के महिलांना लाभ
 • गेल्या 5 वर्षात देशाचा आत्मविश्वास वाढवला, वेगाने विकास करणारी अर्थव्यवस्था
 • असंघटित कामगारांसाठी पेन्शन योजना, 60 वर्षे पार कामगारांना 3 हजार रुपये पेन्शन
 • ग्रॅच्युईटीची मर्यादा 10 लाखांहून 20 लाखांवर, 10 कोटी असंघटित कामगारांसाठी केंद्राची श्रमयोगी पेन्शन योजना
 • कामगारांचे कल्याण हाच आमचा हेतू, 5 वर्षात औद्योगिक क्षेत्रात शांतता निर्माण केली
 • कामगारांना 7 रुपये बोनस, 10 कोटी असंघटित कामगारांना लाभ, 21 हजार पगार असलेल्यांना 7 हजारापर्यंत बोनस
 • पशुसंवर्धन, मत्सपालनासाठी शेतकरी क्रेडिट कार्ड, कर्जामध्ये 2 टक्के सूट
 • दोन हेक्‍टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी थेट सहा हजार जमा होणार. 1 डिसेंबर 2018 पासूनच योजना लागू होणार. 3 हप्त्यात ही रक्कम जमा होणार.
 • गोमातेच्या संवर्धनासाठी कामधेनू संवर्धन योजना
 • आयुषमान भारत योजना लागू झाल्यानंतर जवळपास दहा लाख गरिबांनी याचा फायदा. तीन हजार कोटी रुपयांचे उपचार करण्यात आले. इतक्या कमी काळात. जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना मोदींच्या कल्पनेतून साकारली
 • पाच वर्षात 1 कोटी 53 लाख घरं बनवली. मागच्या सरकारच्या तुलनेत हा आकडा पाच पट अधिक आहे
 • जीएसटीने देशाचे आर्थिक आरोग्य सदृढ बनले
 • रियल इस्टेटमध्ये पारदर्शकता आणली, रेरासारखे कायदे आणले, रेरामुळे बेनामी संपत्ती असणाऱ्यांचे पितळ उघडे पडले
 • गरिबांना स्वस्त दरात धान्य दिलं, गरिबांना वीज दिली
 • सकारात्मक योजनांमुळे परकीय गुंतवणूक वाढली
 • 2020 पर्यंत प्रत्येकाला घर, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार  
 • बँकिंग व्यवस्था पारदर्शी व्हावी यासाठी अनेक निर्णय
 • राज्यांना आधीच्या तुलनेत 10 टक्के निधी जास्त मिळतोय  
 • बँकिंग व्यवस्था पारदर्शी व्हावी यासाठी अनेक निर्णय घेतले  
 • महागाईवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश, भारत पुन्हा एकदा प्रगतीच्या वाटेवर, नव्या भारताच्या दिशेने वाटचाल  
 • 2020 पर्यंत प्रत्येकाला घर, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: budget 2019 piyush goyal begin budge speech parliament main point