शेअर बाजारात अवतरले तेजीचे वारे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

सेन्सेक्स २५६ अंशांनी उसळला; निफ्टीमध्ये ९३ अंशांची वाढ

मंबई - पाचशे व हजारच्या जुन्या नोटा बंद झाल्याने आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्याने काल कोसळलेला शेअर बाजार गुरुवारी वधारला. पाचशे व हजारच्या जुन्या नोटा बंद झाल्याने त्या जमा होऊन बॅंकांतील भरण्यात वाढ होणार असल्याने आज बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात मोठी वाढ झाली. 

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स आज २६५ अंशांनी वाढून तो २७ हजार ५१७ अंशांवर बंद झाला. काल निर्देशांक ३३८ अंशांनी कोसळला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ९३ अंशांनी वाढून ८ हजार ५२५ अंशांवर बंद झाला. धातू, बॅंकिंग, दूरसंचार, ऊर्जा, वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांवर आज विक्रीचा जोर राहिला. बॅंक ऑफ इंडिया, पीएनबी, बॅंक ऑफ बरोडा, एसबीआय, कॅनरा बॅंक, येस बॅंक, फेडरल बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी बॅंक यांच्या समभागात १३.७१ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली. 

अमेरिकेतील गुंतवणूकदारांनी ट्रम्प यांच्या निवडीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने जभरातील शेअर बाजारांमध्ये तेजी निर्माण झाली. ट्रम्प यांची धोरणे व्यवसाय अनुकूल असतील, अशी शक्‍यता वाढल्याने जगभरातील शेअर बाजार वधारले. आशियाई देशांतील शेअर बाजारांत आज तेजीचे वातावरण होते. युरोपीय देशांतील शेअर बाजारांमध्येही आज तेजी दिसून आली.

Web Title: Built back in the market share gained